💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या ठिय्या आंदोलनाचे यश....!


💥मनपा अभियंत्यांनी केली प्रगती नगर व पवनसूत नगरची पाहणी, लवकरच होणार कामांना सुरुवात💥

परभणी (दि.०७ आक्टोंबर) - शहरातील कारेगाव रोड वरील प्रगती नगर व खानापूर रोड वरील पवनसूत नगर येथील नागरिकांकडून  परभणी शहर महानगर पालिका मागील २५ वर्षा पासून मालमत्ता कर वसूल करित असून त्या बदल्यात येथील रहिवाश्याना मनपा कडून कुठल्या हि प्रकारच्या नगरी सुविधा देण्यात येत नाहीत. येथील नागरिकांना तात्काळ नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा त्यांचा मालमत्ता कर व्याजासह परत करा या मागणी साठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि. ०३ आक्टोबर २०२२ रोजी प्रगती नगर व पवनसूत नगर येथील रहिवाश्यासह परभणी शहर महानगर पालिका प्रशासना विरोधात महानगर पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार ठिय्या आंदोलन केले होते या वेळी आंदोलकांनी दोन तास मनपा चे प्रवेश द्वार बंद करून मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महानगर पालिका आयुक्ताना निवेदन देण्यात आले होते व प्रगती नगर व पवनसूत नगर येथील नागरिकांना तात्काळ नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा त्यांचा मालमत्ता कर व्याजासह परत करा या मागणी चे निवेदन दिले होते.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवेदनाची व ठिय्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत मनपा आयुक्त यांच्या आदेशाने आज दि. ७० आक्टोबर २०२२ रोजी परभणी शहर महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त शिवाजीराव सरनाईक, उपअभियंता सुधीरसिंग तेहरा व शाखा अभियंता दिनेश भंडे यांनी प्रगती नगर व पवनसूत नगर येथील रस्ते व गटारांची पाहणी केली व येथील नागतिकांशी संवाद साधला या भागात मागील अनेक दिवसापासून बंद असलेली घन्टा गाडी तात्काळ सुरु करून रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवले जातील व जेसीबी च्या साह्याने गटारे मोकळी केली जातील तसेच आज केलेल्या स्थळ पाहणीचा अहवाल आयुक्त मॅडम यांना सादर करून कायम स्वरूपी विकास कामांना सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिले.

मागील २५ वर्षा पासून नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या प्रगती नगर व पवनसूत नगर येथील नागरिकांना प्रहार जनशक्ती पक्षा मुळे न्याय मिळणार आहे त्या मुळे परिसरातील नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले. या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके पाटील, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताई जुमडे, सय्यद युनूस, शहर चिटणीस वैभव संघई, महानदा माने, रमाताई गंधारे, मिनाताई कांबळे, नर्मलाताई भारशंकर, तारीकाताई  मेश्राम, कमलबाई हनवते, आनंद कांबळे, ऍड. संजय खिल्लारे, दिलीप खिल्लारे, दीपक जोधळे इत्यादी सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या