💥पुर्णेतील बुध्द विहारातील विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही - खासदार संजय उर्फ बंडू जाधव


💥बुध्द विहारात सौर ऊर्जा साठी देणार 10 लाख रुपयांचा निधी असेही यावेळी खा.जाधव म्हणाले💥


पुर्णा (दि.१० आक्टोंबर) - संपूर्ण मराठवाड्यामध्ये पूर्णा शहरातील बुद्ध विहार हे धम्म चळवळीचे केंद्र आहे येथून मिळणारी समता अहिंसा व करूना याची शिकवण मानवाला शांततेचा संदेश देते या विहारातील भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी मागील 40 वर्षापासून त्यांनी धम्म कार्याला गती दिली असून त्यामुळे येथील बुद्ध विहारातील विविध विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही येथे सध्या सौरऊर्जेसाठी 10 लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांनी केली.


दिनांक 9 ऑक्टोबर रोजी बुद्ध विहार येथे पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास समारोप धम्मदेशना वृक्षारोपण व संघदान कार्यक्रमांमध्ये बोलत होते पहाटे 5,30 वाजता परित्राण सूत्र पाठ घेण्यात आला त्यानंतर दुपारी १२:३० वाजता मुख्य कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपासकांच्या वतीने भिकू संघाला संघदान करण्यात आले.


यावेळी व्यासपीठावर भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भनतेपयावश भनते बोधीधमा भनतेसंघरत्न भंते करूनानंद थेरो खासदार संजय जाधव सामाजिक कार्यकर्ते भिमराव हत्ती आंबिरे,नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा धाडसी तरुण नेतृत्व संतोष एकलारे,शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम,संजय सारणीकर रिपाई नेते प्रकाश कांबळे कोषागार अधिकारी ज्योती बगाटे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर रमेश सोनाळे प्राध्यापक डॉक्टर दयानंद कांबळे उत्तम खंदारे मधुकर गायकवाड हर्षवर्धन गायकवाड अशोक ढबाले मुकुंद भोळे पी जी रणवीर दिलीप गायकवाड आदींची उपस्थिती होती यावेळी सर्वप्रथम धम्म देसना देताना डॉक्टर भदंत उपगुप्त महत्व यांनी पूर्णा शहरातील विविध विकास कामा संदर्भात सांगितले की दक्षिण मध्य रेल्वेच्या रेल्वे पटरी वरून शहरातील सिद्धार्थ नगर आंबेडकर नगर परिसरातील नागरिकांना ये जा करण्यासाठी प्रलंबित असलेल्या ओव्हर ब्रिज काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे तसेच शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरातील सुशोभीकरण व त्या ठिकाणी निर्माण करण्यात येणाऱ्या कामासाठी दूरसंचार विभागाची जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी यावेळी त्यांनी सांगितले.


तर त्यानंतर बोलताना खासदार संजय जाधव यांनी सांगितले की पूर्णा शहरातील बुद्ध विहाराच्या विकास कामासाठी सर्वतो परि सहकार्य केले जाईल सन 2009 पासून प्रलंबित असलेल्या रेल्वे पुलाबाबत स्वतः रेल्वेमंत्र्यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरातील सुशोभीकरणासाठी जागा मिळवून देण्यासाठी दूरसंचार मंत्र्यांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेणार असल्याचे ते म्हणाले यावेळी त्यांनी आपल्या मुख्य मार्गदर्शना सांगितले की संपूर्ण मराठवाड्यामध्ये भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरोयांचे कार्य लोक कल्याणाचे आहे त्यांनी नेहमीच चांगल्या कामासाठी पुढाकार घेतला आहे त्यांनी सुरू केलेली ही चळवळ पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे यावेळी खासदार संजय जाधव म्हणाले

 तसेच तथागत भगवान बुद्ध यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारावरच आपण पुढे जात असल्याची त्यांनी यावेळी बोलताना सांगितले बुद्ध विहार समितीच्या वतीने विहारांमध्ये दानशूर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यकर्ते भीमराव हत्ती आंबेरे यांनी मार्गदर्शन केले तर यावेळी उपस्थित असलेल्या उपासक उपासिका यांना भोजनदान खिरदान करण्यात आले कार्यक्रमाला पूर्ण शहरातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या