💥परभणी जिल्हा 'मजलीस-ए-इन्सानियतच्या' कायदे विषयक सल्लागार पदी ॲड.एस.यू.हसन....!


💥संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली💥

परभणी :-  सांप्रत समाजव्यवस्थेत होत जानारी वेगवान स्थित्यंतरे लक्षात घेता, आज घडीला व्यापक, सर्वसमावेशक भूमिका घेवून समाजव्यवस्थेत काम करण्यासाठी मानव मुक्ती मिशन संलग्नित मजलिस-ए-इन्सानियत या संस्थेची बैठक दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी परभणी शहरातील मजलिस ए इंसानियत चे मार्गदर्शन ॲड. एस.यू. हसन यांच्या कार्यालयात संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत माझलीसच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली व तसेच संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत यांच्या हस्ते नियुक्त्या करण्यात आल्या. संस्थेच्या जिल्हा कायदेविषयक सल्लागार पदी ॲड.एस.यू.हसन शहर अध्यक्ष पदी शेख मुसेफ तर शहर उपाध्यक्ष पदी सय्यद इर्शाद आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या. 

या वेळी मजलीस चे जिल्हा कार्याध्यक्ष शेख अझहर, जिल्हाध्यक्ष शेख शकील, जिल्हा उपाध्यक्ष काशिफ रजा, हमीद खानसहाब, शेख रफीक, शेख असलम, व मजलीस चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या