💥मा.राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंतीनिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इटोली येथे वाचन प्रेरणा दिन साजरा...!


💥यावेळी जागतिक हात धुवा दिन देखील साजरा करण्यात आला💥


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील ईटोली येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा  व हात धुवा  दिनाचे अवचित साधून विद्यार्थ्यांनी एक तास वचन करून साजरा केला.

भारताच्या नकाशा मध्ये मुले बसवून तामिळनाडू राज्य साकारत त्याच स्थितीमध्ये एक तास वाचन मुलांसह, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी केले यावेळी गटशिक्षणाधिकारी गांजरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सातवीच्या वर्गाला एक तास विशेष मार्गदर्शन केले.

कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मू.अ. जुमडे सर, चव्हाण सर, मेनकुदळे सर, काळे सर, नागरगोजे मॅडम, दाडगे मॅडम आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या