💥केंद्र व राज्य शासन क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू,आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळांचे क्रीडा मार्गदर्शक यांना माहिती सादर करण्याचे आवाहन..!


💥परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आवाहन💥

परभणी (दि.13 आक्टोंबर) : जिल्ह्यातील केंद्र शासन व राज्य शासन क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच विविध खेळांचे क्रीडा मार्गदर्शक यांची माहिती शासनास सादर करायची आहे. याकरिता परभणी जिल्ह्यातील एकविध खेळ संघटनेतंर्गत खेळातील मागील 10 वर्षातील वर्ष निहाय माहिती संघटनेच्या लेटरपॅड वर खेळाडू, मार्गदर्शक आणि पुरस्कारर्थी यांच्या प्राप्त प्रमाणपत्राच्या सत्य प्रतीसह तसेच शासनाद्वारे आयोजित होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी राज्य, राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय प्राविण्यप्राप्त खेळाडूंनी त्यांची माहिती व्यक्तीशहा किंवा प्राचार्य/मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने खेळाडूंच्या प्रमाणपत्राच्या सत्य प्रतीसह दि. 20 ऑक्टोबर, 2022 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्याकडे सादर करावीत.

याकरीता खेळाडूचे नाव, खेळप्रकार, पुरस्काराचे नाव/उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे नाव, खेळाडुचा पत्ता, फोन नंबर, ई-मेल, आधार कार्ड, ई-मेल, पालकाचा व्यवसाय, आईचे नाव व व्यवसाय आणि क्रीडा मार्गदर्शकांची पात्रता नाव/ पत्ता/ मोबाईल नंबर/ शैक्षणीक पात्रता/ NIS/ डिप्लोमा कोर्स / आंतरराष्ट्रीय खेळाडू/ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/ फक्त कोचिंग बाबतचा अनुभव या बाबींचा स्पष्ट उल्लेख असलेल्या नमुन्यात सादर करावा. प्राप्त माहिती संकलीत करुन राज्य व केंद्र शासनास सादर करावयाची असल्याने संबंधीतांनी आपली माहिती अचुक व वेळेत सादर करावी, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या