💥तेलंगणातील मुनुगोडू विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडनुकीतील आचारसंहितेत २.७० कोटींची रोकड जप्त....!


💥मतदारसंघात निवडणुकीशी संबंधित ९४ प्रकरणांची नोंद :  ४४ जणांना अटक💥

हैदराबाद : तेलंगणातील मुनुगोडू विधानसभा मतदारसंघाच्या  पोटनिवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर २.७० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक कार्यालयाने जारी केलेल्या माहितीमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी सांगितले की उत्पादन शुल्क विभागाने मतदारसंघात निवडणुकीशी संबंधित ९४ प्रकरणे नोंदवली आहेत तसेच ४४ जणांना अटक करण्यात आली असून १९ एफ.आय.आर. नोंदवण्यात आले आहेत निवडणूक आयोगाने अलीकडेच होलोग्रामसह सहा सुरक्षा  वैशिष्ट्यांसह E.P.I.C. (इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्ड) साठी नवीन सुधारित डिझाइन सादर केले आहे ज्या मतदारांनी स्वतःची नावनोंदणी केली आहे परंतु त्यांना कार्ड दिलेले नाही अशा सर्व मतदारांना सुरक्षा वैशिष्ट्यांसह E.P.I.C. मोफत दिले जाईल. 

यावेळी त्यांनी निवडणूक निरीक्षक आय.ए.एस. अधिकारी पंकज कुमार यांची भेट घेऊन निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला मुनुगोडू विधानसभेच्या पोटनिवडणुका शांततेत पार पडण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे, असे ते म्हणाले काँग्रेसचे विद्यमान आमदार कोमातिरेड्डी राजगोपाल रेड्डी यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात ३ नोव्हेंबर २०२२ रोजी पोटनिवडणूक होत आहे त्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता ६ नोव्हेंबर २०२२ ला मतमोजणी होणार आहे..........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या