💥उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळाले....!


💥उद्धव ठाकरेंच्या हाती 'मशाल' तर शिंदे गटाला नवीन चिन्ह सुचवण्याचे निर्देश💥 

 ✍️ मोहन चौकेकर                               

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला चिन्ह आणि नवीन नावे निवडणूक आयोगाने दिली आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'मशाल' हे चिन्ह देण्यात आलं आहे.तर 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असे नाव उद्धव ठाकरे यांच्या गटाला देण्यात आले आहे.तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव देण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला नवीन चिन्ह निवडणूक आयोगासमोर उद्या पर्यंत सादर करण्यास सांगितले आहे.


* शिंदे गटाला नवे तीन चिन्हं द्यायचे निर्देश :-

एकनाथ शिंदे यांच्या गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाकडे दिला होता. मात्र गदा हे चिन्ह धार्मिक असल्याने ते देता येणार नाही असं सांगत शिंदे गटाने तीन नवीन चिन्हांचा पर्याय द्यावा,असे निर्देश निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहेत..... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या