💥पुर्णा तालुक्यातील शेतकरी बांधवांनो सावधान : खाजगी भुसार खरीदारांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होतेय...!


💥शेतकऱ्यांनो बाजार समीती यार्डातील व्यापाऱ्यांनाच विका संचालक डॉ.जयप्रकाश मोदानी यांनी केले आवाहन💥

पूर्णा (दि.१९ आक्टोंबर) - अन्नदाता शेतकरी बांधवांनो कष्टाने पिकवलेला शेतमाल विकताना खाजगी भुसार माल खरेदीदारांकडून होणारी आर्थिक फसवणूक मालाची मोजमाप करतांना वजन काट्यातुन केली जाणारी लुट टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला शेत माल कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डातील अधिकृत आडत व्यापाऱ्यांकडेच विकावा असे कळकळीचे आवाहन बाजार समीतीचे संचालक तथा पुर्णा तालुका आडत व्यापारी असोसिएशनचे धाडसी अध्यक्ष - डॉ.जयप्रकाश मोदानी यांनी केले आहे.


    पूर्णा तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन,मुग उडीत आदीं पिकांच्या काढणीस बऱ्यापैकी सुरुवात झाली असून दिपावली सण उत्सव असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात या दिवसांत आपला अत्यंत कष्टाने पिकविलेला शेतमाल जास्तीत जास्त भाव मिळेल या आशेने विक्री करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यातच हंगाम सुरू झाला की हा शेतमाल खरेदीसाठी तालुक्यात ठिकठिकाणी खाजगी खरेदी दार अचानक अवतरतात अश्याच काही हंगामी खरेदीदारांनी यापुर्वी  तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना जादा भावाचे अमिष दाखवून शेकडो क्विंटल सोयाबीनची खरेदी केली.खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे न देताच गंडा घातल्याचा गंभीर प्रकार घडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.तर काहींनी बाजारपेठेच्या बाहेर आपलं बस्तान बसवून दुकाने थाटून मापात पाप करुन शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या फसवणूक करुन लुट करत असल्याचा अत्यंत दुर्दैवी  प्रकारही करत आहेत. यापासुन शेतकऱ्यांनी सावध होणे अत्यंत गरजेचे आहे.

        यंदाच्या हंगामात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात सोयाबीनच्या हंगाम सुरू झाला आहे. सुरुवातीलाच यार्डातील व्यापाऱ्यांकडे आज रोजी पर्यंत सुमारे ३ ते ४ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याची माहिती आहे. सोमवार दि.१७ रोजी येथिल बाजार समिती यार्डात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शासनाने ठरवून दिलेल्या हमीभापापेक्षा जादा दराने  ४ हजार आठशे रुपयां पर्यंतचा उच्चांकी भाव मिळाला यावेळी व्यापाऱ्यांनी बाजारात बिट पुकारले यावेळी असोसिएशनचे डॉ जयप्रकाश मोदानी, नागनाथ भालेराव, ज्ञानेश्वर कदम, भगवानदास मुंदडा आदीं व्यापा-यांची उपस्थिती होती.येथिल बाजारात शेतमालाला कोणतीही कट्टी,कडता आकारली जात नाही,विक्री झालेल्या मालाचे रितसर वजन करून पावती बनवून पैशाची हमी दिली जाते.असेही त्यांनी सांगितले.पूर्णा तालुका व परिसरातील शेतकऱ्यांनी आपली फसवणूक होऊ नये यासाठी खाजगी खरीदारांच्या भुल थापांना बळी न पडता कृ.उ. बा.समीती यार्डातील अधीकृत व्यापा-यांकडे आपला माल विक्री करावा व    खाजगी खरेदीदारांकडून होत असलेली फसवणूक व वजनकाट्यातुन होणारी लुट थांबवावी असे आवाहन बाजार समितीचे संचालक तथा आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जयप्रकाश मोदानी यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या