💥कृषीच्या विद्यार्थ्यांनी मातीशी नाळ घट्ट करावी - सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे उंदरीकर


💥कृषी तंत्र विद्यालय लातूर येथे शिक्षक- पालक- विद्यार्थी परिसंवाद संपन्न💥 


लातूर (दि.११ आक्टोंबर) - येथील कृषि तंत्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, शेतकऱ्याच्या उन्नतीला व कृषि विकासाला चालना देत उद्यमशीलता जोपासावी यातूनच स्वतःसह समाजाचा पर्यायाने राष्ट्राचा विकास होण्यास मदत होईल. देशाच्या प्रगतीसाठी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व पशुपालक यांच्या कल्याणासाठी कृषिच्या युवक- युवतींनी निष्ठेने व प्रामाणिकपणे कार्यरत राहून मातीशी नाळ घट्ट करावी जेणेकरून कृषि उत्पन्नात विश्वासार्हता व शाश्वतता येण्यास मदत होईल असे प्रतिपादन सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे  उंदरीकर यांनी केले ते लातूर येथील कृषि तंत्र विद्यालयाने नवोदित विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या शिक्षक -पालक -विद्यार्थी परिसंवादात प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषि तंत्र विद्यालयाचे  प्राचार्य डॉ. पद्माकर वाडीकर हे होते आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पद्माकर वाडीकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात गुरुजनांबरोबरच पालकांचाही मोठा वाटा असतो. विद्यार्थ्यांनी स्वतःशी व समाजाशी प्रामाणिक राहून बौद्धिक व प्रात्यक्षिक अभ्यासक्रम कठोर परिश्रम करून पूर्ण करावा. 

     कृषि तंत्र विद्यालयाचा परिसर हा विविध प्रजातींच्या वृक्षराजीने बहरलेला असून भविष्यकाळात हा परिसर 'ऑक्सिजन हब' म्हणून लातूरच्या निसर्ग वैभवात निश्चितच भर टाकेल असा विश्वास प्राचार्य डॉ. वाडीकर यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणात ते पुढे बोलताना असेही म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिस्त पालनातून आदर्श निर्माण करावा व आई- वडिलांचे स्वप्न साकार करावे.

याप्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून माधव साळबा वाघमारे,  व्यंकट चेवले, श्रीमती भाग्यश्री भंडारी, श्यामसुंदर गायकवाड आदिंची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सुधीर सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रल्हाद गायकवाड यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिंबराज कांबळे, अर्जुन आव्हाड, वसंत पवार, सखाराम राठोड, मनोज राठोड, उषा राठोड, नवनाथ शिंदे, अजय साळुंके,  करण राठोड, भगवान गोरे, आरती घाडगे, कृष्णाजी बुर्री, सिद्धी देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या