💥कामगारांना ‘ई-श्रम’ पार्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन.....!


💥विविध 300 प्रकारच्या व्यवसायाच्या गटातील कामगारांचा सामावेश यामध्ये होत आहे💥

परभणी (दि.17 आक्टोंबर) : केंद्र सरकारमार्फत असंघटीत कामगारांची माहिती एका राष्ट्रीय डेटाबेसमध्ये साठविण्यासाठी ई-श्रम पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. यामध्ये सर्वक्षेत्रातील असंघटीत कामगारांचा समावेश होत असून यामध्ये बांधकाम कामगार, घरेलु कामगार, हातगाडीवाले, बिडी कामगार, भाजी व फळविक्रेते, सुतार कामगार, मच्छीमार यासारख्या विविध 300 प्रकारच्या व्यवसायाच्या गटातील कामगारांचा सामावेश यामध्ये होत आहे.

केंद्रशासनाच्या ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी पात्रता पुढील प्रमाणे असणार आहे. यामध्ये कामगार 16 ते 59 वयोगटातील असावा. कामगाराचा भविष्य निर्वाह निधी व कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद असावा. तसेच आयकर दाता नसावा, नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आवश्यक आहे. आधार कार्ड, बँक पासबुक, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक, वयाचा पुरावा. असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी अपल्या नजीकच्या नागरी सुविधा केंद्रा (CSC) मध्ये जाऊन किंवा CShram Portal URL:eshram.gov.in या संकेतस्थळावर विनामूल्य आपले ई-श्रम कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगारअधिकारी विद्याधर मानगांवकर यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या