💥महिलांचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य - राष्ट्रसंत गोविंद देवगिरी


💥जिंतूर येथे आयोजित व्याख्यान प्रसंगी राष्ट्रसंत गोविंद देवगिरी यांनी मनोगत व्यक्त केले💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.१९ आक्टोंबर) :- हिंदू संस्कृतीत हिंदुस्थानात रामायण महाभारत आदी काळापासूनच महिलांचा सन्मान करण्याची शिकवण असल्यामुळे आजही महिलांचा सन्मान करणे ही संस्कृती जपून असल्यामुळे महिलांच्या हातून खऱ्या अर्थाने संसाराचा उद्धारच होत आहे असे विचार राष्ट्रसंत व अयोध्या येथील श्रीराम मंदिर न्यास कोषाध्यक्ष तथा मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर न्यास उपाध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरी जी महाराज यांनी जिंतूर येथे आयोजित व्याख्यान प्रसंगी मनोगत व्यक्त केले.

अमूल्य जीवन कन्येचे या विषयावर स्वर्गीय वर्षा कालानी साबू यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी जिंतूर येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात व्यासपीठावर बोलताना गोविंद देवगिरीजी यांनी रामायण महाभारत आणि इतिहासातील महिलांच्या कुटुंब आणि समाजाप्रती असलेल्या काळजीचे विस्तृत वर्णन करून शाकुंतल या ग्रंथा मधील अनेक श्लोकाचे उदाहरण दे त महिलांच्या कर्तव्य निष्ठेची इतिहासात व ग्रंथांत चांगली नोंद असून रामायण आणि महाभारतातील प्रसंगात माता मंदोदरी माता कैकयी माता सीता यांच्या अनेक सविस्तर अशी माहिती त्यांनी  उदाहरणासह दिली प्रथम साबू परिवाराच्या वतीने त्यांचे भव्य दिव्य स्वागत त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले तर श्रीकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित व्याख्यानापूर्वी त्यांचा सन्मान तुलाभार करून करण्यात आला पंचधातू अभिषेक करून त्यांना शिवशाही पगडी प्रदान करून भव्य दिव्य सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनीही त्यांचे स्वागत केले तर आचार्य महेशानंदपुरी महाराज जिंतूरकर संदीप महाराज शर्मा ह भ प बंडू महाराज ईटोलीकर यांच्यासह तालुक्यातील अनेक संत महात्म्य व्यापारी महाराजांचे शिष्य महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या