💥वर्तमानपत्राचा आत्मा मुळातच जाहीरात असतो त्यामुळे जाहीरात मागणे हा गुन्हा तर नक्कीच ठरत नाही...!


💥जनहीतवादी वृत्तांकनाच्या मोबदल्यापोटी पैश्याची मागणी करणे हा जनहीतवादी पत्रकारीतेसह लोकशाहीचा घात💥

✍🏻परखड सत्यता :-

जनहीतास्तव सातत्याने बातम्या प्रकाशित करीत प्रशासनासह जनमतातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे जनसामान्यांच्या मुलभूत नागरी असुविधांच्या गंभीर प्रश्नांकडे तसेच सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याया विरोधात परखडपणे वास्तविकता दर्शवणारे लिखाण करीत लक्ष वेधून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे प्रत्येक निष्पक्ष जनहीतवादी पत्रकारांचे आद्य कर्तव्यच असते परंतु हे कर्तव्य पार पाडीत असतांना नाईलाजाने संबंधित वर्तमानपत्राच्या हितास्तव मोठे व्यवसायिक अर्थात व्यापारी प्रतिष्ठाण चालक कारखानदार उद्योजक अन् ज्यांच्या बातम्यांना पत्रकारांकडून वेळोवेळी प्राधान्य दिले जाते असे पक्ष पदाधिकारी लोकप्रतिनिधी आदींना त्यांच्याच प्रसिध्दीसाठी विनंती पुर्वक वर्षाला एकवेळ मतदार/जनसामान्यांना शुभेच्छापर जाहिरात मागणे हा त्या वर्तमान पत्राच्या प्रतिनिधीचा अर्थात पत्रकाराचा अधिकारच असतो कारण वर्तमानपत्र चालवणे म्हणावे तितके सोपे नसते त्या वर्तमानपत्राचा आत्मा मुळात जाहीरात हाच असतो त्यामुळे जाहीरात मागणे हा गुन्हा तर नक्कीच ठरत नाही...परंतु जनहीतवादी वृत्तांकनाच्या मोबदल्यापोटी संबंधित व्यक्तीला किंवा सामाजिक संस्थेला पैश्याची मागणी करणे हा मात्र निश्चितच तत्वनिष्ठ जनहीतवादी प्रसार माध्यमांसह जनहीतवादी पत्रकारांच्या तत्वांनुसार लोकशाहीची घाण करणारा सर्वात मोठा गुन्हाच ठरतो अन् असा गुन्हा करणारा व्यक्ती निश्चितच मुळात जनहीताशी बांधिलकी जोपासणारा पत्रकार नसतो पत्रकारीतेच्या बुरख्याआड स्वार्थ साधत पत्रकारीतेला बदणाम करणारा तो एक संधीसाधू निश्चितच असतो अन् असे तथाकथित संधीसाधू सामाजिक स्वास्थ्याला वेळोवेळी डसण्याचा प्रकार करीत असतात अश्या पोटभरू संधीसाधूंची संख्या हल्ली मोदींच्या वाढलेल्या अनियंत्रित महागाई प्रमाणे समाजमाध्यमात प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे ग्रामीण/शहरी भागात प्रत्येक दिपावलीसह प्रत्येक सार्वत्रिक निवडणूक काळात अश्या असंख्य तथाकथित वृत्तपत्र प्रतिनिधींचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्याचा प्रकार दिसून येत असतो वर्षभराच्या काळात परिसरात कुठेही निदर्शनास न आलेली नवनवीन वर्तमान पत्र आणि त्यांनी निर्माण केलेले तात्पुरते प्रतिनिधी या काळात पावसाळी बेडकांप्रमाणे प्रत्येक ठिकाणी संघटीतपणे शासकीय/निमशासकीय/राजकीय पक्ष कार्यालयांत जहिरात पत्रकांसह हातात एखादी डायरी घेऊन फिरतांना आढळून येतात अशी संधीसाधू मंडळी ज्या वर्तमानपत्राच्या नावावर जाहिरात जमा करण्याचा उद्योग थाटतात अन् त्या वर्तमानपत्राच्या संपादकांच्या डोळ्यात देखील धुळ झोकण्याचा प्रकार करतात उधारीतील जाहिरांतीचे साहित्य पाठवून जाहिरात न छापण्याच्या अटीवर भ्रष्टाचारी मंडळींकडून मिळालेली नगदी स्वरूपातील रक्कम मात्र परस्पर लाटून आपली दिवाळी सोईस्कररित्या साजरी करण्याचा उद्योग थाटतात अन् मग सुरू होते शासकीय अधिकारी/कर्मचारी राजकीय पक्ष पदाधिकारी/लोकप्रतिनिधी आणि उद्योग व्यापार क्षेत्रातील जाहीरातदात्यांच्या डोकेदुखीला.....अश्या टोळधाडींकडून सोईनुसार तात्पुरत्या व्यवसायाच्या दृष्टीने मिळवलेले वर्तमानपत्र अन् त्यापुढे प्रतिनिधीचे नाव अन् त्यांच्या मोबाईल नंबरसह प्रत्येक कार्यालयांत स्वतंत्र डायऱ्यांमध्ये त्यांच्या नोंदी झालेल्या आढळतात अश्या वेळेला जनहीतवादी पत्रकारांना डावलून या टोळधाडींना सांभाळण्याची वेळ संबंधितांवर येते गेली वर्षभर नैतिक/अनैतिक मार्गाने कमावलेल्या अर्थसाठ्यातून अचानक निर्माण झालेले असंख्य हिस्सेदार भ्रष्टाचारी मंडळींना नाईलाजास्तव खुष करावेच लागतात अन् मग सुरूवात होते जनसामान्यांच्या आर्थिक/मानसिक सोशनाला सुरुवात....म्हणतात ना 'धन्या हाती धत्तुरा अन् चोराच्या ताटात मलिदा' अशी अवस्था एकंदर सर्वत्र झाल्याचे पाहावयास मिळते याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे आपल्या पदांचा गैरवापर करीत भ्रष्ट कारभाराला प्राधान्य देणारे शासकीय/निमशासकीय/राजकीय भ्रष्टाचारी जाहीरात वाटपावेळी जात/धर्म आणि समसमान कुर्मांच्या आधारे काही स्वतःच्या मर्जीतील संधीसाधू बोक्यांनाच प्राधान्य देऊन वर्षभर आपला भ्रष्ट कारभार सुरक्षितपणे कसा चालेल याची विशेष जवाबदारी देखील अत्यंत सुरळीतपणे पार पाडीत आपल्या दुष्कृत्यांनी निर्माण झालेला आपल्या बुडाखालील अंधार दडपण्याला विशेष प्राधान्य देत धन्य धन्य होत असतात....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या