💥जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघातील तमाम शेतकरी बळीराजा यांचे स्वप्न साकार - आमदार मेघना दिदी बोर्डीकर


💥यावेळी राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 

आज आडगाव दराडे येथील श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचा प्रथम गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम राष्ट्रीय संत श्री गोविंददेव गिरी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी आ.रामप्रसादजी बोर्डीकर साहेब,आमदार मेघना दिदी साकोरे बोर्डीकर साहेब,मीनाताई बोर्डीकर,भावना मुंगसे बोर्डीकर,स्वप्ना अमोल यादव, विजयराव वरपूडकर,ब्रिजगोपाल तोष्णीवाल,नाथराव कदम,अजित मगर,सरपंच बबन जायभाये,सुनील भोंबे,सदाशिव निकम,प्रदीप चौधरी, गजानन घुगे,एकनाथ देशमुख,सुनील मते,तसेच  जिंतूर आणि सेलू तालुक्यातील व जालना जिल्ह्यातीलही सर्व शेतकरी बांधव  आणि कारखान्याचे एमडी सह संपूर्ण अधिकारी वर्ग यानिमित्ताने उपस्थितित होते.


  उपस्थित राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर यांनी जो शेतकरी बांधवांसाठी कारखाना उभारणीसाठी जो निर्णय घेतला आहे तो निर्णय खरोखरच अतुलनीय असून आपल्या या शुभ कार्यास मी सदैव अपल्या पाठीशी असल्याचे आशीर्वाद पर भाषणामध्ये सांगितले तसेच रामप्रसादजी बोर्डीकर यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये मतदार संघातील शेतकरी बांधवांसाठी या कारखान्याची उभारणी केली असून सर्वसामान्य जनतेला याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे आवर्जून सांगितले तसेच आमदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर आणि भावना मुंगसे बोर्डीकर यांनी आपल्या मनोगत पर भाषणामध्ये सुद्धा माझ्या बाबांनी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण झालं याचा आम्हा दोघींना सार्थ अभिमान असून यापुढे देखील मतदार संघातील ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी  त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आणि आर्थिक उन्नती होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे यानिमित्ताने त्यांनी आवर्जून सांगितले.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या