💥सोनपेठ येथे रास्त भाव दुकानातून आनंदाचा शिधा वाटपास प्रारंभ....!


💥तहसीलदार सारंग चव्हाण,माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप💥

सोनपेठ (प्रतिनिधी) : राज्य शासनाकडून दिवाळीनिमित्त  शंभर रूपयात आनंदाचा शिधा देणार असल्याची  मागील आठवड्यात घोषणा करण्यात आली होती, त्याप्रमाणे सोनपेठ शहरात तहसीलदार सारंग चव्हाण ,माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांच्या हस्ते रास्त भाव दुकानातून शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना शुक्रवार दि.२१ रोजी आनंदाचा शिधा वाटपास प्रारंभ करण्यात आला.

लाभधारकांना साखर तेल चणाडाळ रवा या चार वस्तूचे किट शंभर रुपये प्रमाणे वाटप करण्यात आले, यावेळी विनोद चिमणगुंडे कृष्णा कुसुमकर यासह लाभार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या