💥पुर्णा तालुक्यात परतीच्या पावसाने माजवला हाहाकार : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांना न्याय देतील काय ?


💥परभणी जिल्हा युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख तथा शिवसेना युवा नेतृत्व माणिकराव सुर्यवंशींचा कृषी मंत्र्यांना खडा सवाल💥


परभणी (दि.१६ आक्टोंबर) - जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृष्य पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला गेला असून प्रचंड प्रमाणात झालेल्या शेतांना अक्षरशः तलावांचे स्वरूप आले त्यामुळे पुर्णा-गोदावरी नद्यांसह ओढे नाल्यांच्या परिसरातील शेतकऱ्यांनी कापून शेतांमध्ये जमा केलेले व काही शेतशिवारात कापून ठेवलेले सोयाबीनचे पिक अक्षरशः वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेला घास निसर्गनाने हिरावून नेल्यामुळे ऐन दिपावली सनाच्या वेळेला शेतकऱ्यांवर अक्षरशः रक्ताश्रू ढाळण्याची वेळ आली असतांना राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाईसह विमा कंपन्यांना तात्काळ विमा मंजूर करण्याचे सक्तीचे आदेश देऊन शेतकऱ्यांना न्याय देतील काय ? असा खडा सवाल शिवसेनेचे धडाडीचे युवा नेतृत्व तथा परभणी जिल्हा युवा सेनेचे मा.उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी पाटील यांनी केला आहे.


पुर्णा तालुक्यात परतीच्या पावसाने केलेल्या प्रचंड नुकसानी संदर्भात पुढे बोलतांना माणिकराव सुर्यवंशी म्हणाले तालुक्यात अक्षरशः ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हाता तोंडाला आलेल्या सोयाबीन पिकाची तर अक्षरशः वाट लागली असून कापूसासह भाजीपाला फळ बागायतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतांना जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यासह राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार काय झोप घेत असा सवालही सुर्यवंशी पाटील यांनी उपस्थित केला असून यावेळी पुढे ते म्हणाले की हिदुत्ववाद आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या नावावर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापण केलेल्या शिवसेना शिंदे गट व भाजप सरकारणे तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी नसता शिवसेना/युवा सेना अन्नदाता शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव व आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाडसी युवा नेतृत्व माणिकराव सुर्यवंशी पाटील यांनी दिला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या