💥हिंदू धर्मात भेदभाव नष्ट होऊन सुधारणा व्हावी ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ईच्छा होती - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


💥नागपूर मधील पत्रकार परिषदेत केलेल्या विधानाचा गैर अर्थ लावू नये - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

✍️मोहन चौकेकर 

नागपूर  (दि.०६ आक्टोंबर) :- सवर्ण हिंदू धर्मियांचा अस्पृश्य दलित वर्गाबद्दल दृष्टिकोन बदलत नव्हता. अस्पृश्यांना हिंदू धर्मात जगण्यासाठीचे मूलभूत अधिकार नव्हते. भारत देशाला जसे स्वातंत्र्य आवश्यक होते तसेच अस्पृश्य वर्गाला हिंदू धर्म सोडून धर्मांतर करणे आवश्यक झाले होते. हिंदू धर्मात अस्पृश्य दलित समाजाचा उद्धार होऊ शकत नाही.अस्पृश्य दलित वर्गाला मानवतेचे अधिकार मिळवून देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ भारतात स्थापन झालेल्या बौद्ध धम्माची दिक्षा घेतली असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. 

नागपूर येथील आयटीआय मैदानात आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ना.रामदास आठवले बोलत होते. दुपारी नागपूर मधील पत्रकार परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची धम्मदीक्षा का घेतली याबाबतचा इतिहास सांगताना मी केलेल्या विधानाचा गैरअर्थ लावून चुकीची वृत्त प्रसारित केले जात आहे तसे चुकीचे वृत्त कोणी प्रसारित करू नये असा खुलासा ना.रामदास आठवले यांनी यावेळी केला यावेळी विचारमंचावर रिपाइंचे राष्ट्रीय संघटन सचिव भुपेश थुलकर;सभाध्यक्ष भीमराव बनसोड;  रिपाइं नागपूर शहर अध्यक्ष बाळू घरडे; सौ.सीमाताई आठवले; सौ.शिलाताई गांगुर्डे; दयाळ बहादूर; पूर्व विदर्भ अध्यक्ष  विजय आगलावे; राजन वाघमारे; महेंद्र मानकर; विनोद थुल; सागर मानकर; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

हिंदू धर्मातील अन्यायकारक अस्पृश्यता भेदभाव नष्ट होऊन हिंदू धर्मात सुधारणा व्हावी ; हिंदू धर्मीयांनी अस्पृश्यांना समतेने वागवावे; त्यांना समान अधिकार द्यावेत ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ईच्छा होती. त्यासाठी दलितांच्या सामाजिक न्यायासाठी मानवमुक्तीचा  समतेचा संगर त्यांनी उभारला. त्यासाठी महाड च्या चवदार तळे येथील पाण्याचा सत्याग्रह;  नाशिक च्या काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केला.त्या सत्याग्रहात सवर्ण हिंदूंनी अस्पृश्य दलित वर्गावर हल्ला केला. सवर्ण हिंदू अस्पृश्य वर्गाला हिंदू म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हते. 

हिंदू धर्मात सुधारणा व्हावी.हिंदू धर्माने अस्पृश्यांना स्वीकारून त्यांना मानवतेचे समान अधिकार द्यावेत ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ईच्छा होती. मात्र हिंदू धर्मातील सवर्णांच्या दृष्टिकोनात बदल होत नसल्याने अस्पृश्यांच्या उद्धारासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी मी हिंदू म्हणुन जन्मलो मात्र हिंदू म्हणून मरणार  नाही अशी धर्मांतराची घोषणा केली. त्यानंतर 21 वर्षांनी 14 ऑक्टोबर ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हिंदू धर्मात सुधारणा व्हावी ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ईच्छा होती मात्र तसे झाले नसल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली असे मत ना.रामदास आठवले यांनी आज नागपूर मध्ये व्यक्त केले.त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावून अर्धवट वाक्य घेऊन प्रसिद्धी मध्यमांनी अर्थाचा अनर्थ करू नये आणि चुकीच्या बातमी मुळे अन्य कोणी चुकीचे आरोप करून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजात चुकीचे संदेश देऊन वातावरण गढूळ करू नये तर  66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आनंद वाढवावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपाइं चे महाराष्ट्र् राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे आणि राष्ट्रीय संघटन सचिव भुपेश थुलकर यांनी केले आहे.....

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या