💥सावधान : राज्यात कोरोनाच्या नव्या तीन विषाणूंचा शिरकाव....!


💥आरोग्य यंत्रणा सतर्क : तज्ज्ञांकडून यंत्रणांना व नागरिकांना इशारा💥

 ✍️मोहन चौकेकर

महाराष्ट्रात एकीकडे दिवाळीची धूमधाम सुरु आहे तर दुसरीकडे थोडी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. राज्यात कोरोनाच्या तीन विषाणूची एन्ट्री झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्याची माहिती समोर येत आहे.तज्ज्ञांच्या माहितीनुसार, एक्सबीबी हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट राज्यात आढळून आला आहे.

या नव्या व्हेरियंटमुळे रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राज्यात बीए 2.3.30 आणि बीक्यू.1 हे नवे व्हेरिएंट शिरकाव करत असल्याचे समोर आले आहे.तर राज्यातील कोव्हिड रुग्णसंख्या मागील आठवड्याच्या तुलनेत 17.7 टक्क्यांनी वाढली असून ठाणे, रायगड आणि मुंबई भागामध्ये ही वाढ अधिक ठळक प्रमाणात दिसत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हिवाळ्यामध्ये हे प्रमाण वाढू शकते असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे.

राज्यात बीए. 2.75 चे प्रमाण 95 टक्के वरून 76 % वर आले आहे. तर एक्सबीबी हा नवीन व्हेरिएंट राज्यात आढळला असून त्याचे प्रमाण वाढताना दिसतंय, हा व्हेरियंट बीए.2.75 पेक्षा अधिक वेगाने पसरू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. फ्ल्यू सारखा कोणताही आजार अंगावर काढू नका, तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या आणि त्यानुसार उपचार करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना दिल्या आहेत....

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या