💥७० टक्के शेतकऱ्यांच्या ई पीक पाणी साठी महसूल अलर्ट तहसीलदार सखाराम मांडवगडे थेट बांधावर....!


💥तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी तालुक्यातील पुंगळा येथे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन केले💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर 

जिंतूर : तालुक्यात फक्त ३० टक्के शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदणी झाली असल्याने तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदणी सध्या बाकी आहे. शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आता महसुल विभाग अलर्ट झाला असल्याचे चीत्र दीसत असुन. तहसीलदार सखाराम मांडवगडे हे आपल्या टीमसह थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. सोमवारी तालुक्यातील पुंगळा येथे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन केले.

           ई-पीक पाहणी मोहीम १५ ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांना सहभागी होण्याची अंतिम तारीख दिली गेली असली तरी जिंतूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शेतकऱ्यांच्या सहभाग वाढविण्यासाठी आता महसूल यंत्रणा सतर्क झाली आहे. मोहिमेच्या एक भाग म्हणून तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सहभागी करून घेतली आहे. १० ऑक्टोंबर रोजी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी पुंगळा  शिवाऱ्यात शेताच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी करण्यात आली. यावेळी  नायब तहसिलदार ओमप्रकाश गोंड, मंडळ अधिकारी सारिका हेडगे, जिंतूर सज्याचे तलाठी नितीन बुट्टे व भोगाव सज्याचे तलाठी रुपेश वाव्हळे यांनी शेतकऱ्यांना भेटी दिल्या.व त्यांनी शेतकऱ्यांना या मोहीमेत सहभागी होण्याचे आव्हाण केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या