💥परभणीत जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन साजरा....!


💥या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी पोलिस निरीक्षक प्रकाश कुकडे हे होते💥

परभणी (दि.04 आक्टोंबर) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत 17  सप्टेंबर 2022 ते 02 ऑक्टोबर 2022 या कालावधीत सेवा पंधरवडा (कर्तव्यपथ) राबविण्याचे निश्चित झाले आहे. जिल्ह्यात दिनांक 01 ऑक्टोबर 2022 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी पोलिस निरीक्षक प्रकाश कुकडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यालय अधिक्षक सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बि. एन. स्वामी हे उपस्थित होते. 

यावेळी कनिष्ठ लिपीक, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण एस.जी.चक्रवार यांनी मातापिता व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ अधिनियम 2007, आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ नियम 2010 या कायद्याची माहिती व उद्देश सांगीतला. यावेळी अध्यक्ष  श्री. कुकडे यांनी ज्येष्ठ नागरिक घरामध्ये राहण्याचे फायदे त्यांचे अनुभव हे उपयोगी असल्याचे मत मांडले. तर ज्यांच्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत ते भाग्यवान आहेत असेही म्हटले. तसेच मातापित्यांच्या अडचणी समजुन घेऊन वृध्दाश्रमामध्ये पाठविण्याची वेळ येऊ देऊ नये यांना सन्मानाची वागणुक देण्यात यावी व त्यांच्याशी नियमित संवाद साधावा अशी आदरयुक्त भावना व्यक्त केली.

याप्रसंगी श्री स्वामी यांनी ज्येष्ठ नागरिक बद्दल आदरयुक्त भावना व्यक्त केल्या तसेच वृध्दाश्रम ही संकल्पनाच त्यांना मान्य नाही असे ही ते म्हणाले. तसेच ज्या मुलांना आई-वडिलांनी मोठे केले त्या मुलांची त्यांच्या आई-वडिलांना सांभाळ करण्याची जबाबदारी आहे. यानंतर स्नेह महिला, वृध्दाश्रम असोला येथील परिचारिका लीना पाठक यांनी सुंदर भावगीत सादर केले तसेच तेथील एक प्रवेशित ज्येष्ठ महिलेने स्वतः रचलेले गीत सादर केले त्या गीतावर उपस्थित सर्वांचे डोळे पानावले. यानंतर सर्व ज्येष्ठ नागरिक व उपस्थित विद्यार्थी यांना फळाचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमीत्ताने ज्येष्ठ नागरिक/मतदार यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये दिलेल्या सहभागावाबत त्यांचा सत्कार म्हणुन 80 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणा-या अशा 5 ज्येष्ठ नागरिकांना मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या सहिचे पत्र सन्मानपूर्वक सुपुर्द करण्यात आले. समाजल्याण निरीक्षक, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण टि.डी. भराड यांनी उपस्थितांचे आभार मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या