💥वामनदादांच्या गझलसंग्रहामूळे मराठी गझल चळवळीला गती मिळेल - डाॅ.बबन जोगदंड


💥राणीसावरगावात वंचित गझलसंग्रह पुस्तकाचे प्रकाशन संपन्न💥


राणीसावरगांव (बातमीदार ) - महाकवी वामनदादा कर्डक यांच्या उपलब्ध असलेल्या काव्य रचनांपैकी अनेक कवितांचे लेखन हे गझल प्रकारातील असून वामनदादांच्या गझलसंग्रहामुळे मराठी साहित्यात मोलाची भर पडली आहे.गझलकार वामनदादा कर्डक यांनी लिहीलेल्या आंबेडकरवादी जाणीवेच्या मराठी गझलांचे संकलन केलेला वंचित गझलसंग्रह गझल चळवळीला उपलब्ध झाल्याने मराठी गझल चळवळीला नक्कीच गती मिळेल असे प्रतिपादन डाॅ. बबन जोगदंड (यशदा पुणे) यांनी केले.

[ राणीसावरगाव येथे वंचित गझलसंग्रह या पुस्तकाचे प्रकाशन करताना डाॅ. बबन जोगदंड, डाॅ. राम वाघमारे, डाॅ. कीर्तीकुमार मोरे, पुस्तकाचे संपादक संजय रायबोले, विलासराव जंगले, गटशिक्षणाधिकारी पोले आदी मान्यवर उपस्थित होते ]

मंगळवारी (ता.२५) रोजी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना केले.  महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने स्वयंदिप प्रकाशन पुणे यांच्या माध्यमातून संजय रायबोले यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या निवडक १०० गझलांचे संपादन केलेल्या 'वंचित गझलसंग्रह ' गझलकार-वामनदादा कर्डक या पुस्तकाचे प्रकाशन डाॅ.बबन जोगदंड यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासराव जंगले होते. प्रमुख मार्गदर्शक  मराठी विषयाचे प्रा. डाॅ. कीर्तीकुमार मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. राम वाघमारे (नांदेड), गटशिक्षणाधिकारी पोले (नांदेड), कृष्णाभैया दळणर, प्राचार्य सुरेश शिरसे,प्राचार्य डॉ. आनंद घन, विनोदअण्णा भोसले, गोपीनाथ कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल सुर्यवंशी, गझलकार यशवंत मस्के, गझलकार आतम गेंदे, गझलकार आत्माराम जाधव, सुभाष साबळे, प्रा.प्रदिप जाधव, अनिल स्वामी, शाहीर गणेश पंचरंगे, यादव परतवाघ,समाधान गायकवाड,  मिलिंद साळवे, चरणदास साळवे, शेषेराव सोपने, दयानंद कुदमुळे, सुलक्षणाताई कचरे, बा.ह.वाघमारे, प्रा. डाॅ.शंकर घाडगे,प्राचार्य गुलाबराव कांबळे, के.एम.रोडे, पत्रकार विजय बगाटे, विजय कुलदीपके,श्रीकांत गायकवाड ,नवनाथ साळवे,पत्रकार भाऊसाहेब मकापल्ले, उमाकांत कुदमुळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी प्रा.शिवशंकर डोईजड यांनी केले तर  प्रा. महादेव सुरनर यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे माधवराव मोते, अशोकराव कांबळे, गोविंद गायगोधने, नानासाहेब कांबळे, राजाराम साबणे, संभाजी कांबळे, माधवराव रायबोले, बालासाहेब रायबोले, गौतम साळवे, बाबासाहेब रायबोले, समाधान नाटकर, अशिषभैया कांबळे, जयपाल साळवे, अनिल रायबोले, सुनिल रायबोले, अनिल कांबळे आदींनी परिश्रम घेतले.......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या