💥माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात सामाजिक न्याय विभागाचा 90 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा...!💥यावेळी बी.एच.सहजराव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली💥

परभणी (दि.१५ आक्टोंबर) - शहरातील माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह परभणी येथे आज दिनांक 15 ऑक्टोंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्याच्या सामजिक न्याय स्थापना दिन, व कर्मवीर दादासाहेब गायकवाड, व भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या महापुषांची जयंती साजरी करून अभिवादन करून 90 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या 90 वा वर्धापन दिन परभणी शहराचे पहिले उपनगरअध्यक्ष, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते बी.एच. सहजराव काका व संस्थेचे सचिव प्रमोद अंभोरे यांच्या हस्ते केक कापून, विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे वाटून व छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून साजरा करण्यात आला.

या वेळी बी.एच. सहजराव काका यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना बाबतची माहिती देऊन व सामाजिक न्याय विभागाच्या कार्याची माहिती देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. व त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व त्यांच्या जीवनावर मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती परभणी शहराचे पहिले उपनगरअध्यक्ष, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते बी.एच. सहजराव काका, माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा समाजहित अभियान प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रमोद अंभोरे, समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा सौ. रमाताई घोंगडे, सरीताताई आंभोरे, प्रकाश वडधुतीकर,  वसतिगृह अधीक्षक सुभाष अंभोरे वसतिगृह कर्मचारी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शेख अझहर यांनी केले तर आभार प्रदर्शन रमाताई घोंगडे यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या