💥नियमित वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी वैतागवाडी येथील शेतकऱ्यांचे 33 केवी केंद्रासमोर उपोषण...!


💥आम आदमी पार्टीचा उपोषणास पाठिंबा💥 

परभणी (दि.११ आक्टोंबर) - कृषी पंपाना नियमित व दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी वैतागवाडी तालुका सोनपेठ येथील शेतकऱ्यांनी करम येथील सब स्टेशन समोर मंगळवारी उपोषणास प्रारंभ केला. आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी उपोषणकर्त्याची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला.


वैतागवाडी शिवारातील शेतकऱ्यांना यापूर्वी गंगाखेड येथून जात होता. पण मागील एक दीड वर्षापासून वैतागवाडी हे गाव सोनपेठ तालुक्यात असल्याने त्यांना करम तालुका सोनपेठ येथील 33 केवी केंद्रामधून बीजपुरवठा जोडण्यात आला. करम येथून वीजपुरवठा जोडल्यानंतर पहिल्यासारखा नियमित वीज पुरवठा होत नव्हता. अनियमित वीज पुरवठा ला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्याला वेळोवेळी भेटून निवेदन दिली.याचा काहीच फरक पडला नाही. शेवटी आज मंगळवार 11 ऑक्टोबर रोजी ते 33 केवी सबस्टेशन करम च्या समोर शेतकऱ्यांनी या उपोषणास प्रारंभ केला. या उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची आज आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी भेट घेतली व त्यांना पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपण शेतकऱ्यांना पाठीशी राहू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महावितरणचे अभियंता व जिल्हाधिकारी यांच्याशी यासंदर्भात संवाद साधून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी वैतागवाडी शिवारातील अरुण वैजनाथराव डाके , विठ्ठल होरे , राम मरगळ अमोल होरे , ज्ञानोबा सदस्यर , छत्रगुण कचाले , यशवंत निले , चिमाजी वैतागे , सोपान होरे , विठ्ठल नामदेव होरे , राभास्करठोड , शंकरराव कांबळे , बाबुराव कांबळे , नामदेव जंबा वैंकटी , रंगनाथ निळे , रंगनाथ निळे ,  सुधा जंबाले, मोतीराम राठोड, शेषेराव आचारावे, राजेभाऊडे, महादेव कवचले, आश्रोबा होरे, महादेव वैतागे, दत्ता होरे, कोंडी वैतागे, बाबाराव बटे, विठ्ठल राठोड, माधव मुलगा, गणेशाडतीराम राठोड, लिठोराम राठोड, राजेभाऊ राठोड, राजेभाऊ राठोड,गंगाराम खासदार, सुभाष विजय जाधव, प्रेमदास आडे, राजेभाऊ लाभे, भागवत निळे, बालासाहेब निळे, प्रल्हाद भाऊ बचाटे आदी शेतकरी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या