💥राज्यातील 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मोठा निर्णय....!


💥परभणीच्या जिल्हा पोलिस अधिक्षक पदावर रागसुधा.आर यांची नियुक्ती💥


 
✍️ *मोहन चौकेकर*

दिवाळीपूर्वीचं शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या अचानक तडका फडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये उप आयुक्त तसेच पोलिस अधिक्षक पदाच्या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.मुंबई, ठाणे, पुणे,सिंधुदुर्ग,जळगाव, नागपूरसह अनेक शहरातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आज सायंकाळी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

*पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुखांची बदली झाली आहे. अंकित गोयल आता पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक आहेत.तर पोलीस उपायुक्त निलोत्पल यांची गडचिरोली पोलीस अधीक्षकपदावर बदली झाली आहे.

*सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदी पवन बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बनसोडे हे अप्पर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण येथे कार्यरत होते.तर सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्रकुमार दाभाडे यांची बदली करण्यात आली आहे.

*परभणीत महिला राज पहायला मिळाले आहे. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तां नंतर आता जिल्हा पोलीस अधीक्षक ही महिलाच झाल्या आहेत.

*रागसुधा आर परभणीच्या नवीन पोलीस अधीक्षक आहेत. पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची बदली झाली आहे. रागसुधा आर ह्या, यापूर्वीही सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून परभणीत आल्या होत्या.

*सांगली पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांचीही बदली झाली आहे. बसवराज तेली सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक आहेत.*

*जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच बदली झाली असून जळगाव पोलीस अधीक्षकपदी नागपूर लोहमार्ग पोलीसचे एम.राजकुमार यांची वर्णी लागली आहे.

*नागपूर पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांची बुलडाणा पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. मुबंईच्या राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असलेले रविंद्रसिंग परदेशी यांची चंद्रपूरच्या पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती झाली आहे...

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या