💥अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि पिकविम्यासाठी शेतकऱ्यांचा 21 ऑक्टोबर रोजी महा रास्तारोको आंदोलन....!💥सर्वपक्षीय व विविध संघटनेच्या बैठकीत निर्धार💥                              

परभणी (दि.17 आक्टोंबर) - अतिवृष्टीने वाताहत झालेल्या शेतकरयांना मदत म्हणून परभणी जिल्हा तात्काळ ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा आणि सर्वाना सरसगट पीकविमा जाहीर करा या मागणी साठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 21 ऑक्टोबर रोज शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता महा रास्ता रोको आंदोलन ब्राह्मणगाव फाटा येथे करण्यात येणार आहे.          

परभणी कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज सकाळी विविध पक्ष, शेतकरी संघटनेसह विविध संघटनेच्या प्रतिनिधींची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेले अजूनही पिके पाण्यात उभी आहेत.शासनाने त्वरित जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करून सर्वांना नुकसान भरपाई पोटी मदत जाहीर करावी, मागच्या वर्षीच्या पीक विमा सह चालू वर्षी 25 टक्के अग्रीम पीक विमा सरसगट जाहीर करावा अशी मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी उपस्थित प्रतिनिधींनी सताधारी सरकार विरोधात प्रचंड रोष व्यक्त करत तीव्र निषेध केला . सरकार विरोधात कायमस्वरूपी लढा संघर्ष समितीच्या माध्यमातून उभा करण्याचा निर्धार करण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 21 ऑक्टोबर 22 रोज शुक्रवारी सकाळी 11 वाजता ब्राहमनगाव फाटा येथे महा रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे . या आंदोलनात शेतकरी बैल जोडी, ट्रॅक्टर सह सहभागी होणार आहेत . या आंदोलनात सर्व शेतकऱयांनी उपस्थित रहावे असे आवाहन या वेळी करण्यात आले. या बैठकीत माणिक कदम, ऍड. माधुरी क्षिरसागर, श्रीमती सोनाली देशमुख, दादासाहेब टेंगसे,पंढरीनाथ घुले पाटील, सुभाष जावळे,

 रंगनाथ चोपडे, प्रा. सुरेश नाईकवाडे, डॉ . धर्मराज चव्हाण,अभाजीत कदम,मुंजाजी चोपडे,प्रल्हाद लाड,रावसाहेब रेंगे,बाळासाहेब आळणे, माणिक हरकळ, मधुकर सीताफळे, कांचन कदम,कल्याण लोहट, निवृत्ती सिताफळे, तुकाराम वऱ्हाडे, कल्याण साबळे,प्रदीप सोनटक्के,गोविंद गिरी,कृष्णा गोरे,रामराव देशमुख,ओंकार पवार, उमेश देशमुख,भारत कणकुटे, शेख अब्दुल,माणिक आव्हाड,माणिक गमे,प्रसाद गोरे,जनार्धन सोनवणे,ऍड सिरेश चौधरी,गोविंद जाधव,मितेश सुकरे,अर्जुन साबळे,इर्शाद पाशा, एकनाथ हरकळ, प्रभाकर हरकळ आदी शेतकरी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या