💥पुर्णेतील श्री.गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालयातील रासोयेतील स्वयंसेवक स्वच्छ अमृत महोत्सव 2.0 या अभियानात सहभागी...!


💥या अभियानातून महत्वाचे शहरातील फळ विक्रेत्यांना स्वयंसेवकांनी कॅरी बॅग वापरणे टाळावे याबद्दल केली जनजागृती 💥

पूर्णा (दि.२० आक्टोंबर) - वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी स्वच्छतेचे दूत राष्ट्रसंत  गाडगेबाबा यांचे विचाररातून जनजागृती होण्याच्या उद्देशाने सार्वजनिक स्थळी स्वच्छता अभियान राबवविले .या अभियानामध्ये एकूण 30  रा.सो.ये तील स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवविला .राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाकडून दिलेल्या सूचना प्रमाणे गोळा केलेल्या एकूण पॉलिथिन बॅग व कॅरी बॅगयांचे  वजन  7.50 किलोग्राम भरले .या अभियानातून महत्वाचे शहरातील फळ विक्रेत्यांना स्वयंसेवकांनी कॅरी बॅग वापरणे टाळावे याबद्दल जनजागृती केली व परिसर सार्वजनिक स्थळे, पर्यावरण मुक्त कसे राहतील याबद्दल सविस्तर माहिती सांगितली.

पूर्णा  नगरीत 2.0 या स्वच्छत अमृत महोत्सव अभियानात श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालयातील रा. से. यो.  विभागातील स्वयंसेवकाने शासनाच्या "स्वच्छ अमृत महोत्सव "या अभियानात सहभाग घेऊन  देशाची सेवा आपले कर्तव्य समजून उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.या  कार्यक्रमास मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के .राजकुमार व उपप्राचार्य डॉ. संजय दळवी यांनी केले.स्वच्छतेचे अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. पुष्पा गंगासागर व डॉ.अजय कुर्रे  व डॉ.सोमनाथ गुंजकर यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या