💥निवृत्ती वेतन धारकांनी सन 2022-23 मधील बचतीची माहिती कोषागार कार्यालयात सादर करण्याचे आवाहन...!


💥असे जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती सुनिता सं सुंकवाड यांनी अवाहन केले आहे💥

परभणी (दि.19 आक्टोंबर) : निवृत्तीवेतन घेणाऱ्या जे निवृत्तीवेतन धारक उत्पन्न करपात्र आहे त्यांच्या निवृत्तिवेतनातून आयकर माहे नोव्हेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत समान हप्त्यात कपात करण्यात येणार आहे. तरी अशा निवृत्तीवेतन धारकांनी आपल्याकडील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये केलेली बचत असेल ती दि. 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत कोषागार कार्यालयात सादर करावी.  जेणेकरून आयकर कपात मध्ये योग्य ती नोंद घेऊन आयकर गणना करणे सोयीचे होईल तसेच ज्यांचे उत्पन्न करपात्र होऊ शकते आयकर गणनेचा नियम 115BAC नुसार OLD TAX REGIME/NEW TAX REGIME पैकी एकाची निवड करून या कार्यालयास दि. 15/11/2022 पर्यंत लेखी कळवावे ज्यांची माहिती मुदतीत प्राप्त होणार नाही त्यांची आयकर गणना OLD TAX REGIME प्रमाणे करण्यात येईल. असे जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती सुनिता सं सुंकवाड यांनी अवाहन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या