💥तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022-23 पूर्वतयारी बैठक व ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन....!


💥स्पर्धेची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यात सर्वत्र प्रभावीपणे राबविली जाणार💥

परभणी, (दि.18 आक्टोंबर) : जिल्हा व तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022-23 या शैक्षणिक वर्षातील शालेय तालुका, जिल्हा व विभागस्तर क्रीडा स्पर्धेचे आयोजन नियोजन पारदर्शक व यशस्वीपणे संपन्न होण्याकरीता स्पर्धेची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यात प्रभावीपणे राबविली जाणार आहे. 


या प्रणालीमध्ये शाळेची माहिती, प्राथमिक संघ/खेळाडू प्रवेशीका, प्रवेश फी चालान, खेळाडू नोंदणी, संघ निवड, तालुका/जिल्हा क्रीडा स्पर्धा कार्यक्रम, स्पर्धा निकाल, प्रवेशिका तयार करणे, प्रमाणपत्र ऑनलाईन काढणे, विविध रेकॉर्ड तयार करणे इतर अनुषंगिक बाबींचा समावेश असणार आहे. ही माहिती शैक्षणीक संस्थेने स्वत: भरावयाची आहे. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयाबाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार असून, त्याकरीता दि. 21 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता श्री. शिवाजी महाविद्यालय, वसमत रोड, परभणी येथे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व तालुकास्तरावरील खेळाचे आयोजन-नियोजन व वेळापत्रक तयार करण्याकरीता शाळा, विद्यालय, महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षकांना किंवा क्रीडा विभागाचा कार्यभार असलेल्या क्रीडा प्रमुखांना वरील ऑनलाईन प्रशिक्षणास उपस्थित राहणेबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी आवाहन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या