💥20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शासकीय शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा....!


💥जिंतूर तालुका आम आदमी पार्टीने निवेदनाद्वारे केली मागणी💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर तालुका आम आदमी पार्टी घ्या वतीने  राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी ज्याचा जावक क्र.संकीर्ण 2022/प्र. क्र.37/ टि.एन.१. या पत्रामध्ये मुद्दा क्र. 4 व 5 विशेषता महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत घातकी आहे. यामध्ये ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती तसेच सदर शाळा बंद करण्याबाबत त्या विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे. याची माहिती मागविली आहे. म्हणजेच शासनाला हि माहीती मागवुन 0 ते 20 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करायच्या आहेत हे स्पष्ट होते. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थी पटसंख्येवरून कुठलीही शाळा बंद करता येत नाही. 

शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे असावे असा नियम आहे. तसेच ० ते १४ वयो गटातील कुठलेही मूल शाळाबाह्य राहू नये याची विशेष काळजी शासनाला घ्यावी लागते. म्हणूनच राज्यभरात वाड्या वस्त्यांवर जिल्हा परिषदेच्या शाळा कार्यरत आहेत. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा ह्या आदिवासी पाडे दुर्गम भागातील मुला - मुलींच्या शिक्षणासाठी सुरू आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे त्या शाळा बंद होतील आणि तेथील मुले शाळाबाह्य होतील तसेच मुद्दा क्र. 5 नुसार शिक्षण विभागाने रिक्त पदे इतक्या मोठ्या प्रमाणात भरती केल्यास खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक भार येईल असे म्हंटले आहे. शासन पटसंख्येवरून शाळा बंद करून त्या शिक्षकांचे समायोजन इतर शाळांवर करेल आणि शिक्षक भरती केली जाणार नाही. असा शासनाचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून ज्या शाळा वाड्या - वस्त्यांवर सुरू आहेत. त्या शाळा बंद करून शासनाला गोरगरिबांना शिक्षणा पासून वंचित ठेवायचे आहे. आणि हे संपूर्ण भारतीय घटना विरोधी आहे . म्हणून पटसंख्या वरून शाळा बंद करण्याचा असवैधानिक निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा तसेच सध्याची शिक्षक भरती प्रक्रिया ही भ्रष्टाचारास खतपाणी घालणारी आहे . त्यामुळे शिक्षक भरती करतांना ती सरसकट केंद्रीय पद्धतीने करण्यात यावी. तसेच सरकारी शाळा मोडकळीस येण्याचे कारण खर्चाची तरतूद कमी करणे हे आहे त्यामुळे शिक्षणावर सकल उत्पन्नाच्या किमान सहा टक्के खर्च प्रत्यक्ष कृतीतून करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करीत आहोत. शासनाने सदर पत्राबाबतची कार्यवाही तात्काळ न थांबविल्यास जिंतूर तालुकासह राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांना , पालकांना, व समस्त नागरिकांना सहभागी करून रस्त्यावर आंदोलन केले जाईल. सोबतच न्यायालयामध्ये दाद मागण्यात येईल. असे आव्हान तालुकाध्यक्ष ॲड.मोहसिन महेफुज पठान यांनी केले सदरील निवेदनावर ॲड.मोहसिन महेफुज पठान,सुधीर राठोड सर,वासेफोडद्दिंन काझी सर,सलमान बाबा, अजहर खान, सय्यद सलमान यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या