💥परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांचा उद्या शुक्रवार दि.14 ऑक्टोबर रोजी परभणी जिल्हा दौरा...!


💥पुर्णा येथील बळीराजा शुगर फॅक्टरीला सकाळी 11-00 वाजता भेट देणार💥

परभणी (दि.13 आक्टोंब) :  राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत हे दि.14 ऑक्टोबर, 2022 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे.

श्री.सावंत हे शुक्रवार, दि. 14 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 09.15 वाजता पुणे येथून हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण करतील.  सकाळी 11.00 वाजता बळीराजा शुगर फॅक्टरी पूर्णा जि. परभणी येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी कडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे आगमन. सकाळी 11.30 ते 01.00 जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथून मोटारीने बळीराजा शुगर फॅक्टरी पूर्णा जि. परभणी कडे रवाना.  दुपारी 1.30 वाजता बळीराजा शुगर फॅक्टरी पूर्णा जि.परभणी येथे आगमन व हेलिकॉप्टरने उस्मानाबाद (धाराशिव) कडे प्रयाण करतील.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या