☀️शांतीदुत सेवाभावी संस्थेच्या वतीने 101 गरजू व्यक्तींना कपडे व मिठाईचे वाटप....!


 ☀️या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतीदूत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा हे होते☀️     

परभणी (दि.23 आक्टोंबर) - येथील शांतीदुत सेवाभावी संस्थेच्या वतीने आज रविवार दि.23 आक्टोंबर रोजी दिपावली निमित्य 101 गरजू व गोरगरीब व्यक्तीना कपडे व मिठाई चे वाटप परभणीचे खा. संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतीदूत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर, पोलीस निरीक्षक समाधान चौरे , डॉ. दिनेश भुतडा ,पत्रकार नितीन धूत,प्राचार्य बाळासाहेब जाधव, प्राचार्य सुरेश नाईकवाडे,डॉ. रितेश अग्रवाल, डॉ. सालेहा कौसर,सौ. वर्षा सारडा , डॉ . राधा अग्रवाल,आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना खा. संजय जाधव यांनी   शांतिदुत गेल्या 25 वर्षांपासून शांतिदुत  गोरगरिबांच्या घरी दिवाळी साजरी व्हावी म्हणून हा उपक्रम राबवते तो स्तुत्य आहे .कपडे वाटप, हिवाळ्यात ब्लँकेट वाटप आणि उन्हाळ्यात पाणी वाटप करून शांतिदुत ने आपली सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे म्हटले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव सारडा,केशव सारडा,बलराम सोमाणी,गौरव बाहेती,सेजल सारडा आदीने परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या