💥पॉपुलर फ्रंट ऑफ़ इंडिया या देशविरोधी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा...!


💥महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली निवेदनाद्वारे पोलिस प्रशासनाकडे मागणी💥

महाराष्ट्र राज्यातील पुणे,नांदेड,परभणी,बिड या ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) क्या पथकाने छापे टाकून पॉपुलर फ्रंट ऑफ़ इंडियाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून या कारवाई नंतर पिएफआयच्या समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या या घटनेचा देशभरात निषेध केला जात आहे.


पॉपुलर फ्रंट ऑफ़ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या देशविरोधी घोषणांच्या निषेधार्थ आज पुर्णा शहरात मनसेचे पिएफआय विरोधात ,पाकिस्तान विरोधात,दहशतवाद विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला पिएफआय च्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांना देण्यात आले.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के,पुर्णा तालुका अध्यक्ष अनिल बुचाले मनसे शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर सचिन आवरगंड तालुका अध्यक्ष शेतकरी सेना पंकज राठोड उप शहर अध्यक्ष,योगेश भोसले,विनायक बोकारे ,भरत बोबडे,आकाश ठाकूर,भागवत ढोणे,गोलू भोसले आदी तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या