💥परभणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख सचिन पाटील यांचा मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण खुन...!


💥मनसे युवा नेत्याच्या झालेल्या निर्घृण खुना मुळे परभणी हादरली💥परभणी (दि.०६ सप्टेंबर) - शहरातील वसमत रस्त्यावरील शिवराम नगर भागातील रहिवासी असलेल्या नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख  सचिन पाटील या युवक नेत्याचा आज मंगळवार दि.०६ सप्टेंबर २०२२ रोजी मध्यरात्री ०३-०० ते ०३-३० वाजेच्या सुमारास ब्लेडचे वार करून निर्घृण खून करण्यात आला या घटनेमुळे परभणी पुन्हा एकदा हादरली आहे.


मनसे शहर प्रमुख सचिन पाटील शिवनगर भागात आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारत बसले होते त्यावेळीच वादातून तो प्रकार घडला अशी माहिती हाती आली आहे दरम्यान हा घातपाताचा प्रकार आहे  हे लक्ष्यात आल्या बरोबर नवा मोंढा पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेवून तपास सुरू केला आहे कारण सचिन पाटील यांच्या मानेवर ब्लेडचे वार आढळून आले. त्यांचे बंधू व सहकाऱ्यांनी सचिन पाटील यांना तातडीने वसमत रस्त्यावरील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले तेथून दुसरीकडे हलवले. परंतु उपचार सुरू असताना  त्यांचे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने निधन झाले.नवा मोंढा पोलिसांनी पाटील यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाकरता दाखल केला आहे.

पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते युवा नेते आहेत. परभणी शहर प्रमुख म्हणून ते सद्या पक्षात कार्यरत होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या