💥परभणी जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समिती बैठक संपन्न.....!


💥ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे याकरिता त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश💥

परभणी (दि.26 सप्टेंबर) : ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे तसेच त्यांच्यासाठी असलेल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीच्या बैठकीत सर्व विभाग प्रमुखांना दिल्या.


जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीचे अध्यक्षा  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माता-पिता व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ अधिनियम 2007, आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ नियम 2010, राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013, शासन निर्णय दि. 09 जुलै, 2018 ची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत दि. 23 सप्टेंबर, 2022 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या की, औरंगाबाद विभागामध्ये ‘थोडेस आई - वडीलांसाठी पण’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कक्ष स्थापन करण्यात यावे जेणे करुन येथे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे विचार व्यक्त करता येतील, त्यांची करमणुक होईल अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. 1 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणुन साजरा करण्यात यावा अशा सूचना ही उपस्थित सर्व विभागप्रमुखांना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवाडा (कर्तव्यपथ) 17 सप्टेंबर 2022 ते 02 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ज्येष्ठ नागरिक यांची आरोग्य तपासणी करणे बाबात सुचित केले.....

            यावेळी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गीता गुठ्ठे यांनी परभणी तालुक्यातील स्नेह महिला वृध्दाश्रम,  येथे दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणीचा कार्यक्रम आयोजीत केला असल्याचे सांगीतले. तसेच राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 शासन निर्णय दिनांक 09 जुलै 2018 प्रमाणे सर्व विभागाने काय कार्य करावयाचे आहे याची विस्तुत माहिती दिली.

            तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विभागाने वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित रुग्णालयामध्ये 5% खाटांची सोय करावी. ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा, अॅबुलन्स सेवा उपलब्ध करावी. सेवाभावी संस्थांचा सहभाग वाढवावा. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र स्वागत कक्ष यांचा समावेश करावा इ. गृह विभाग (पोलीस) यांनी ज्येष्ठ नागरिकांचा, पिळवणुक यापासुन संरक्षण करावे. ज्येष्ठ नागरिकांच्या जिवितांचे व मालमत्तेचे संरक्षण करावे. विविध स्तरातुन होणारा छळ करण्याबाबत कृती आराखडा तयार करावा. एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची वेगळी यादी करावी. तसेच राष्ट्रीय हेल्पलाईन जिल्ह्याचे क्षेत्रीय अधिकारी दिपक कऱ्हाळे यांनी सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्र. 14567 सुरु करण्यात आला असल्याचे सांगितले. या हेल्पलाईन च्या माध्यमातुन ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य जागरुकता, निवारा इत्यादीबाबत माहिती देण्यात येते. तसेच कायदे विषयक मार्गदर्शन भावनीक आधार क्षेत्रीय पातळीवर मदत करण्यात येते. या हेल्पलाईनचा प्रचार व प्रसिध्दी करणेबाबत सर्वांना यावेळी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गीता गुठ्ठे यांनी आवाहन केले....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या