💥मंगेश देशमुख यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे पेडगाव मंडळाचा अग्रिम सर्वेक्षणात समावेश...!


💥पीक परिस्थितीच्या नुकसानीची वास्तवता देशमुख यांनी उपस्थित जिल्हाधिकारी गोयल यांच्या निदर्शनास आणून दिली💥

परभणी (दि.०७ सप्टेंबर) - परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात काल मंगळवार दि.06 सप्टेंबर रोजी सन 2022 -23 करिता खरीप पीकविमा संदर्भात जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक झाली, त्या बैठकी मध्ये शेतकरी प्रतिनिधी म्हणून पेडगाव येथील प्रगतिशील शेतकरी मंगेश देशमुख हे आमंत्रित होते. या बैठकीत प्रतिकूल परिस्थिती जोखीम करिता नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्ह्यातील 8 मंडळांचा  समावेश करण्यात आला होता. त्यात पेडगाव मंडळाचा समावेश नव्हता. परंतू पेडगाव महसूल मंडळातील पीक परिस्थितीच्या नुकसानीची वास्तवता मंगेश देशमुख यांनी उपस्थित मा.जिल्हाधिकारी व इतर सर्वांच्या निदर्शनास पुराव्यानिशी आणून दिली. 


त्यामुळे पेडगावसह जिल्हयातील आणखी इतर पाच मंडळाचा त्यात समावेश करण्यात आला व त्या सर्व मंडळांचे प्रतिकूल परिस्थिती जोखीम करिता नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश मा.जिल्हाधिकारी यांनी प्रशासनास दिले. लवकरच पेडगाव महसूल मंडळासह जिल्ह्यातील 13 मंडळात पंचनामे होणार आहेत. या बैठकीला पीकविमा विषयी सखोल अभ्यास असणारे आमचे सहकारी हेमचंद्र शिंदे, विश्वंभर गोरवे उपस्थित होते. पेडगाव मंडळाची परिस्थिती प्रभावीपने मांडून पेडगाव मंडळाचा अग्रिम साठीच्या सर्वेक्षणात समावेश करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल मंगेश देशमुख यांचे पेडगाव मंडळातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार व हार्दिक अभिनंदन.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या