💥विधान परिषद विरोधी पक्ष नेते ना.अंबादास दानवे यांच्या हस्ते आरतीने संभाजीनगर शहराचे ग्रामदैवत कर्णपुरा यात्रेला सुरवात...!


💥विरोधी पक्ष नेते दानवे यांच्या हस्ते सपत्नीक आरती करून विधिवत घटस्थापना करण्यात आली💥

✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर / औरंगाबाद : दि.२६ सप्टेंबर.

सुमारे ३५० वर्षांचा इतिहास असणारे संभाजीनगर / औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत  कर्णपुरा देवी यात्रेला आज सोमवार (२६ सप्टेंबर) पासून सुरुवात झाली प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी यात्रेची जय्यत तयारी केली असून नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवाची सुरुवात प्रथम दिनी पहाटे ३:०० वाजता विधीवत महापूजा, ७:०० वा. महाआरती, ७:१५ वा. घटस्थापना  हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा संस्थापक अध्यक्ष अंबादास दानवे यांच्या हस्ते सपत्नीक आरती व घटस्थापना करून विधिवत  पूजन करून करण्यात आली.

नऊ दिवस धार्मिक उत्सवा बरोबरच भाविकांसाठी जागरण गोंधळ विविध  कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले , संतोष दानवे,संतोष मरमठ,राजेंद्र दानवे,राजू राजपूत,अभिजीत पगारे,पराग कुंडलवाल,लक्ष्मण बताडे, जगन्नाथ दानवे, आकाश दानवे,नंदू लबडे,नारायण कानकाटे,प्रभात पुरवार,पोपटराव दानवे,अंबादास भानुदास दानवे,अनिल दानवे आदी भाविक भक्तगण माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या