💥पुर्णा तालुक्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने काढला बैलगाडी मोर्चा...!


💥उठ अन्नदाता शेतकरी बांधवा जागा हो....आपल्या न्याय-हक्कासाठी लढा देणाऱ्या मजबूत आंदोलनाचा मजबूत धागा हो💥

पुर्णा (दि.१३ सप्टेंबर) - पुर्णा तालुक्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी भव्य बैल गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे.

पुर्णा तालुक्यात सुरुवातीला सतत ४०-४५ दिवस पाऊस झाला त्यात कसे तरी पीक थोड्या प्रमाणात वाचवण्यात शेतकऱ्यांना यश आले. पण नंतर २५ ते २८ दिवस पावसाने दडी मारली त्यामुळे शेंगा भरण्याच्या अवस्थेत असणारे सोयाबीन जाग्यावरच करपले त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे शासन शेतकऱ्यांना मदत म्हणून पण काहीच जाहीर करत नाहीये

या करिता पूर्णा तहसील कार्यालयार भव्य गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे तालुक्यातील संपूर्ण शेतकरी वर्गाने दि.१९ सप्टेंबर २०२२ रोज सोमवार वेळ सकाळी ११-०० वाजता आपली बैलगाडी घेऊन ताडकळस टी पॉईंट या ठिकाणी आंदोलनात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अभी नहीं तो कभी नहीं :-

पूर्णा तालुका हा चळवळीच्या दृष्ठिने अत्यंत मागासलेला तालुका आहे आपल्याला काही गोष्टी सहज मिळत नसतील तर त्या संघर्ष करून घ्याव लागतात आत्ता संघर्ष करण्याची वेळ आली आहे
उठ शेतकरी बांधवा जागा हो....आपल्या न्याय-हक्कासाठी लढा देणाऱ्या आंदोलनाचा मजबूत धागा हो....असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के यांनी केले आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या