💥पुर्णा तालुक्यातील सुहागन विविध कार्यकारी सेवा सोसायटी शिवसेनेच्या ताब्यात....!


 💥चेअरमनपदी सुभाष भोसले तर व्हाईस चेअरमनपदी राघोजी भोसले यांची बिनविरोध निवड💥

पूर्णा (दि.१४ सप्टेंबर) - तालुक्यातील सुहागन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी शिवसेनेच्या ताब्यात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक दी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी संस्थेच्या कार्यालयात मा श्री आर पी गायके साहेब सहायक निबंधक तथा निवणुक निर्णय अधिकारी म्हणून उपस्तीत होते संस्थेचे सचिव श्री माने यांनी सर्व निवडणूक प्रकिर्या वाचवून दाखवली त्या वेळी चेअरमन पदासाठी शिवसेनेचे सुभाष भोसले तर व्हा चेअरमनपदी शिवसेनेचे राघोजी भोसले यांची निवड झाल्याचे जाहीर केले 

या वेळी नवनिर्वाचित श्री सुभाष रामजी भोसले,राघोजी लक्ष्मण भोसले, दशरथ निवृत्तीराव भोसले,बालाजी नामदेव भोसले,गणेश बळिराम भोसले, खुशाल भवानजी भोसले,विठ्ठल विश्वनाथ भोसले सौ जिजाबाई हिराजी भोसले, सौ वर्षा भागवत भोसले, तुकाराम रामराव लहाने, वाघमारे गौतम संतुका ,भालेराव माणिक तुळशीराम इत्यादी संचालक उपस्तीत होते

  या वेळी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते या निवडीबद्दल जिल्हाप्रमुख विशाल कदम  सभापती बालाजी देसाई,हिराजी भोसले, उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे ,अनिल बुचाले मनसे तालुका अध्यक्ष यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा चेअरमन यांचे स्वागत केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या