💥परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील पांढरगाव येथील भूमीपुत्र सैनिक विष्णू व्यंकोबा बडे यांना विरमरण....!


💥उद्या शुक्रवार दि.०९ सप्टेंबर होणार अंत्यसंस्कार : त्यांच्या पश्‍चात आई,वडील,पत्नी,१ मुलगा,१ मुलगी,३ भाऊ असा परिवार आहे💥

परभणी (दि.०८ सप्टेंबर) - जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील पांढरगाव येथील भूमीपुत्र विष्णू व्यंकोबा बडे यांना सिकंदराबाद येथे बुधवार दि.०७ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०४-०० वाजता रुग्नालयात उपचार सुरू असतांना वीरमरण आले.

                     गंगाखेड शहरातील विशाल नगर भागात वास्तव्यास असणारे बडे कुटूंबियातील विष्णू बडे भारतीय सैन दलात कार्यरत होते. ते सिकंदराबादला कर्तव्य बजावत होते. त्यावेळीच डेंग्यूची लागण झाल्याने बडे यांना सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंधरा दिवसांपासून उपचार सुरु असतांना बडे यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांच्या मृत्यूने कुटूंबियांसह गंगाखेडवासीयांना मोठा धक्का बसला आहे. बडे यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे.

                     बडे यांच्या पार्थीवावर शुक्रवारी सकाळी 9 वाजता गंगाखेड शहरातील गोदावरी नदीकाठावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हैद्राबाद येथून विमानाद्वारे नांदेडला तेथून वाहनाद्वारे गंगाखेडला बडे यांचा पार्थीव आणण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल प्रशासनाने दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या