💥राष्ट्रसंत श्री श्री किशोरजी व्यास यांच्या आशीर्वादाने हैदराबाद मराठवाडा कन्नडा मुक्ती संग्राम दिन वर्षभर होणार साजरे....!


💥राष्ट्रसंत श्री.किशोरजी व्यास यांचा शब्द प्रधामंत्री मोदी यांनी पाळला : प्रधानमंत्री कार्यालयाचे आदेश झाले प्राप्त💥

हैदराबाद मुक्ती संग्रामातील शेकडो हजारो लाखो हुतात्मा स्वातंत्र्यसैनिकांच्या परिवारातर्फे राम जन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष परम आदरणीय किशोरजी व्यास महाराज यांच्या परमपवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम...


आज मी हे आभार का मानत आहे आणि तेही  कोणकोणत्या आदरणीय महाभाग भद्र पुरुषांचे....

मूळचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व विचारवंत तसेच हैदराबाद मुक्तिसंग्राम मध्ये ज्यांनी रजाकारी च्या अत्याचाराचे चटके सहन केले ते आदरणीय दिलीपजी कस्तुरे साहेब माझे मोडक्यातोडक्या भाषेत लिहिलेले लेख व्हाट्सअप वर ते वाचत असत व कधीकधी वडिलकीचा सल्लाही देत.


मराठवाड्याच्या मातीने जे काय भोगले पूर्वजांनी जे त्यागले त्याच्या कडवट आठवणीने त्यांच्या डोळ्याच्या कडा आजही बोलताना पाणवतात संवेदनशीलता असते ती ही. आणि त्यांच्याच माध्यमातून बरोबर एक महिन्यापुर्वी आम्ही पुणेस्थित परम आदरणीय राष्ट्रसंत श्री श्री किशोरजी व्यास महाराजांच्या सानिध्यात येऊ शकलो.

 माझे व्यक्तिगत राजकीय विचार कोणतेही असतील परंतु शालेय जीवनापासूनच त्यातल्या त्यात मी परभणीच्या मराठवाडा हायस्कूल चा विद्यार्थी असल्यामुळे परम आदरणीय मुख्याध्यापक व संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री ह.बा.दळवी व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक हे संघाचेच पूर्णवेळ वाहून घेतलेले कार्यकर्ते त्यामुळे माझ्या मनात बालपणापासूनच संघाबद्दल एक वेगळा विश्वास आणि आदर आहे.


 मी सामाजिक  राजकीय विश्लेषक म्हणून अत्यंत परखड बोलतो परिणामाची पर्वा ही करत नाही उभा महाराष्ट्र मला या पद्धतीने ओळखतो. या स्वभाव जडणघडणीमध्ये मराठवाडा हायस्कूल मध्ये मला शिकवलेल्या संघ परिवारातील शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.

 माझ्यासारख्या चिखलाच्या गोळ्याला त्यांनी आकार दिला होय ते सर्व शिक्षक वृंद संघ रूपाचे परिपूर्ण प्रतीक त्याच संस्कारामुळे मी कदाचित गोपालन आणि गो सेवेकडे  वळालो असेल.आपल्याला कोणी चांगले म्हणावे यासाठी मी कधीही प्रयत्न केला नाही. हाही  माझ्या बालमनावर माझ्या गुरु मंडळीकडून बालमनावर संघाचा संस्कार झाला असावा.


दरम्यान हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या इतिहासाची सत्यता शोधण्यासाठी निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी व इतिहासप्रेमी संशोधक चिंतक परम आदरणीय लीना ताई मेहंदळे यांच्या प्रत्यक्ष आशीर्वादाने हैदराबाद मराठवाडा कन्नडा स्वातंत्र्य संग्रामाच्या जन्मोत्सवाला अगदी एक वर्षांपूर्वी सुरुवात झाली.

 मराठवाड्यातील प्रत्येक स्वातंत्र्यप्रेमी आणि  हैदराबाद मुक्तिसंग्रामातील प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या लढवय्या वृत्ती ला त्यांच्या इतिहासाला जाणून घेण्याची इतिहास लिखित स्वरूपात पुनरुज्जीवित करण्याची त्यांची हातोटी आमच्यासाठी सर्वात मोठी ऊर्जा ठरली त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आज हैदराबाद मराठवाडा कन्नडा मुक्तिसंग्राम राष्ट्रीय पातळीवर आपली पताका फडकवत आहे.

 मी त्यांचे कोटी-कोटी ऋण व्यक्त करतो :-


12 अगस्त 2022 रोजी  आर. एस. कामते इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कुटुंब प्रमुख परम आदरणीय नंदकिशोर जी  कामठे व त्यांचे यशस्वी उद्योजक  कंपनीचे डायरेक्टर पुतणे आदरणीय महेश जी कामठे यांच्यासह आम्ही महाराजांच्या दर्शनाला निघालो.

 महाराजांनी बोलण्याचा आदेश दिला परवानगी दिली आणि त्यांच्या चरणी हैदराबाद मुक्तिसंग्रामातील लाखो अनामिक हुतात्म्यांचा इतिहास माझ्यासारख्या  मर्कटाला परम आदरणीय श्री श्री किशोर जी महाराजांनी ऐकून घेतले संतांच्या चेहऱ्यावर कधीही भावना उमटत नसतात. परंतु त्या दिवशी होतात त्यांचा इतिहास व त्यांचा होत असलेला उपहास ऐकून महाराजांच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा दिसत होती.

 हिमालयाएवढे उत्तुंग शुभ्र व्यक्तिमत्व राष्ट्रीय महाचरित्र आपल्याला ऐकत आहे हा प्रसंग अंगावर काटा आणणारा होता.अगदी 57 मिनिट माझ्यासारखा मर्कट अव्याहतपणे बोलत होता महाराज श्री शब्द ना शब्द अगदी शांतपणे ऐकत होते. मला तिथेच खात्री पटली होती हे महान आत्माच आपल्याला आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या महान लढ्याला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचतीलच आणि हो घडलेही तसेच...

परम आदरणीय राष्ट्रसंत श्री श्री किशोर जी महाराज यांच्या मुळेच हा प्रश्न आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांना पर्यंत पोहोचला त्यानंतर आर. एस .कामठे परिवाराचे प्रमुख तब्येत नरम-गरम असतानाही आपला मुलगा यश याला बरोबर घेत श्री नंदकुमार जी कामठे साहेब यांनी श्री दिलीप जी कस्तुरे व संत नामदेव ट्रस्टचे अध्यक्ष हिंगोली चे सतीश विदोळकर साहेबांना बरोबर घेऊन दिल्ली  गाठली संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप जी कस्तुरे साहेब व  सतीश विडोळकर यांच्या शुभहस्ते पहिले निवेदन केंद्रातील जेष्ठ मंत्री श्री नितीन गडकरी साहेबांना दिले.

 आणि आदरणीय दिलीप जी कस्तुरे साहेबांनी  सतीश वेलणकर साहेबांबरोबर( v. Satish) दीर्घकालीन कार्य केले त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी सर्व निवेदने व मागणीचे पत्र दिले आणि पुढे त्याच पत्राचा पुढील कारवाई V. सतीश साहेबांनी परभणीकर  या नात्याने हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे त्यांचे घनिष्ठ नाते आहे.त्यांनी ती मागणी आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यालयापर्यंत पोहोचवली. हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील सर्व जनतेच्या वतीने  आम्ही त्यांचे कोटी-कोटी धन्यवाद मानतो.

 हा दुग्धशर्करा योग घडवून आणला संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री दिलीप जी कस्तुरे दादा यांनी सर्व योगदान देऊनही मी काहीच केले नाही हा गुण संघातील कार्यकर्त्यांना प्रचंड उंचीवर नेऊन ठेवतो. मातृभूमीसाठी असलेली ऊर्जा जर जागृत असेल तर माणसाचे शरीरही किती ताकतीने काम करू शकते तिथे वय फक्त संख्या ठरू शकते. इच्छा मरून गेलेल्या  तरुणांनाही म्हातारपण वाटायला लागतं. आणि ज्यांच्यावर राष्ट्र म्हणजेच मातृभूमी आणि मातृभूमी म्हणजेच आपली माता वेदांमध्ये  आदेशित केल्याप्रमाणे हे मातृभूमि तू माझी माता आणि मी तुझा पुत्र. हे वचन खरे ठरते यांच्या प्रखर राष्ट्रभक्ती समोर धर्म भक्ती समोर देव देश आणि धर्म या साठीच जगायचे हे  ब्रत ज्या पवित्र आत्मा यांनी घेतले अशा महानतम व्यक्तीच्या सानिध्यात येणे सुद्धा भाग्य लागते.

  ज्या देशांमध्ये साधुसंत, विद्वानांचा आदर राजकारणी करतात तेथे समृद्धी नांदते. हे वचन भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यशस्वीरित्या करून दाखवत आहेत हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याला त्यांनी राष्ट्रीय महत्त्व प्राप्त करून दिली आणि वर्षभर हा महोत्सव कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्र शासन आणि साजरा करावा यासाठी आदरणीय गृहमंत्री यांच्या नेतृत्वाखाली कमिटीची स्थापना करून त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना आदेशित केले.

 आणि या सर्वांसाठी कारणीभूत ठरले ते राष्ट्रसंत श्री श्री किशोरजी व्यास महाराज यांच्या चरणी पुन्हा एकदा नमन करतो. जय गोमाता जय हैदराबाद मराठवाडा मुक्ती संग्राम. भाग :पहिला अपूर्ण लेखक तथा राजकीय सामाजिक विश्लेषक: सतीश सातोनकर. नानलपेठ परभणी मराठवाडा महाराष्ट्र.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या