💥पुर्णा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदावर प्रताप कदम यांची निवड...!


💥महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान💥


पुर्णा (दि.१९ सप्टेंबर) -
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मा.जलसंपदा मंत्री आ.जयंत पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सोमवार दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी परभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी आढावा बैठकीत पुर्णा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदावर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा स्वराज्य मित्र मंडळाचे शहराध्यक्ष प्रताप अच्युतराव कदम यांची शहराध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या हस्ते प्रताप कदम यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे पुर्व शहराध्यक्ष तथा मा.नगरसेवक अखील अहेमद,नगरसेवक अमजद नुरी,नगरसेवक शेख खुद्दूस,संतोष सातपुते,सामाजिक कार्यकर्ते राज नारायनकर,घनदाट मामा मित्र मंडळाचे शहराध्यक्ष दयानंद कदम,इश्यू पठाण,परशुराम उर्फ बाळासाहेब जोगदंड यांनी अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या