💥जिंतूर तालुक्यात विविध मागण्यांसाठी मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन....!


💥शेकडो मच्छीमार आंदोलनात महिला मुलाबाळांसह सहभागी💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील मच्छीमार व मत्स्यव्यवसायिक यांच्या विविध मागण्यासंदर्भात मत्स्यव्यवसाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, सहाय्यक निबंध परभणी व पोलीस स्टेशन जिंतूर, बामणी, चारठाणा यांच्या विरोधात आज गुरुवारी जिंतूर तालुक्यातील येलदरी जलाशयातील कोलपा परिसरात, तालुक्यातील मच्छीमार बांधवांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

येलदरी जलाशयावर मासेमारी करणाऱ्या समाज बांधवांवर स्व. राजीव गांधी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेने दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, बामणी, चारठाणा, जिंतूर पोलीस ठाण्याच्या खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, येलदरी येथील स्व. राजीव गांधी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, संस्थेच्या बोगस पदाधिकाऱ्यांची चौकशी करावी, मच्छीमारांच्या परवाण्याचे पैसे व कमिशनच्या पैशाच्या हिशोबाची सखोल चौकशी करावी, यासह मच्छीमारांच्या विविध मागण्या संदर्भात आज गुरुवारी जिंतूर तालुक्यातील येलदरी जलाशयातील कोलपा परिसरात शेकडो मच्छीमारांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या जलसमाधी आंदोलनात शेकडो महिला मुलाबाळांसह  सहभागी  झाल्या होत्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या