💥परवानगी बिना बेकायदेशीर वृक्षतोड केल्या प्रकरणी गुरुद्वारा बोर्ड अधिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी...!

💥सामाजिक कार्यकर्ते सरदार सतबिरसिंघ रामगडीया यांनी उपवनरक्षकांकडे निवेदनाद्वारे केली मागणी💥


नांदेड (दि.०५ सप्टेंबर) - येथील पवित्र हुजुर साहीब सचखंड गुरुद्वारा येथील गेट क्रमांक २ च्या डाव्या व उजव्या बाजूस सन २००८ यावर्षी कडुलिंब,वडासह पिंपळाची झाडे लावण्यात आली होती सदरील झाड गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक सरदार शरणसिंघ सोडी यांच्या आदेशाने गुरुद्वारा बोर्ड कर्मचाऱ्यांनी तोडली असून सदरील झाडे तोडतेवेळी गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाकडून बोर्डाचे अधिक्षक यांनी वनविभागाची कुठल्याही कुठल्याही प्रकारची रितसर परवानगी घेतली नसल्यामुळे ही वृक्षतोड बेकायदेशीर असल्यामुळे गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक सरदार शरणसिंघ सोडी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सरदार सतबिरसिंघ बलबीरसिंघ रामगडीया व सरदार प्रकाशसिंघ धरमसिंघ तबेलेवाले यांनी निवेदनाद्वारे दि.०५ सप्टेंबर २०२२ रोजी उपवनरक्षक नांदेड यांच्याकडे केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या