💥पुर्णेतील तडीपार परिसरात अनोळखी २० वर्षीय महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या....!


💥रेल्वे स्थानक क्रमांक चार लगतच्या तडीपार परिसरातील घटना : महिलेची ओळख पटवण्याच्या दिशेने पोलिसांचा तपास💥 

पुर्णा (दि.२० सप्टेंबर) येथील रेल्वे स्थानक क्रमांक चार लगतचा परिसर 'तडीपार' परिसर म्हणून ओळखला जातो या परिसरातीत रात्रंदिवस गुन्हेगारी प्रवृत्तीची मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दिवसेंदिवस छोट्या मोठ्या घटना घडत असतात आज मंगळवार दि.२० सप्टेंबर रोजी देखील अशीच हृदयविदारक घटना घडली असून या परिसरात एका अंदाजे २० ते २२ वर्षीय अनोळखी महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे सकाळच्या सुमारास उघडकीस आले आहे.


शहरातील रेल्वे स्थानक क्रमांक चार लगत झाडाझुडपांनी गजबजलेल्या तडीपार परिसरात घडलेल्या हत्येच्या या घटनेमुळे आसपासच्या परिसरात अक्षरशः भितीचे वातावरण पसरले असून या घटनेची माहिती मिळताच पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.सुभाषचंद्र मारकड.सपोनि.आश्रोबा घाटे,पिएसआय गंगाधर कांबळे,गायकवाड,पोलिस कर्मचारी किशोर कवठेकर,विजय जाधव,रमाकांत तोटेवाड,मनोज नळगीरकर,मंगेश जुकटे,भगवान वाघमारे,महिला पोलिस कर्मचारी देविका मनवर,नसरीन सिध्दीकी,रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक उपायुक्त चंद्रप्रकाश मिना,आरपीएफचे कोरेवाड,इंगोले,जिआरपी राठोड तात्काळ घटना स्थळावर रवाना झाले व त्यांनी घटनास्थळ परिसर प्रतिबंधीत करून घटनास्थळ पंचनामा करीत मयत महिलेचे शव ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्नालयात पाठवण्यात आले सदरील घटनेच्या तपासासाठी पोलिस प्रशासनाने श्वान पथकास देखील पाचारण केले होते या गंभीर घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक श्री जयंत मिना यांनी देखील घटना स्थळाला भेट देत तपासाच्या दिशेनं सुत्र हलवली असून मयत महिलेची ओळख पटवण्याच्या दिशेनं पोलिस तपासाची सुत्र हलवत आहेत....

💥रेल्वे प्रशासनाने संपूर्ण तडीपार परिसर तार किंवा वाल कंपाऊंट करून सिल करण्याची आवश्यकता :-
 


शहरातील रेल्वे स्थानक क्रमांक चार लगतच असलेला रेल्वे प्रशासनाच्या मालकीचा हा तडीपार परिसर दिवसेंदिवस अतिसंवेदनशील होत असल्याचे निदर्शनास येत असून या परिसरात राज्यासह अंतरराज्यातील देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सातत्याने जमा होत असल्याचे निदर्शनास येत असून या परिसरालगतच देशी/विदेशी दारूची दुकान असल्यामुळे हा परिसर गुन्हेगारांसह मद्यपींसाठी देखील जणू नंदनवनासारखा झाल्याचे निदर्शनास येत असून या परिसरात अनेक गंभीर घटना सातत्याने घडतांना पाहावयास मिळत असल्यामुळे या परिसरातून सर्वसामान्य नागरीकांसह महिलांना वावरणे देखील धोकादायक झाल्यामुळे दमरे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना हा परिसर तार किंवा वाल कपाऊटने बंदिस्त करून हा संपूर्ण परिसर सिल करावा अशी मागणी होत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या