💥जिंतूर तालुक्यातील रायखेडा येथे खुल्या कब्बडीचे सामने संपन्न....!


💥यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती उत्तम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील रायखेडा येथे गोर सेनेच्या वतीने कबड्डीचे खुले सामने आयोजित करण्यात आले आहेत. या सामान्यांचे उद्घाटन आज शनिवारी भाजपा युवा नेते इंद्रजीत घाटूळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती उत्तम जाधव यांची उपस्थिती होती या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 11 हजार 111 एक रुपया, द्वितीय पारितोषिक 7 हजार 777 रुपये, तर तृतीय पारितोषिक 5 हजार 555 रुपये असणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी सभापती उत्तम जाधव, भाजपा युवा नेते इंद्रजित घाटूळ, भाजपा ऊसतोड आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष राठोड, पांडुरंग आढे, राजू जाधव, भारतीय जनता पार्टी उस तोड़ कामगार आघाड़ी तालुका अध्क्षक्ष जिंतुर गोरख चव्हाण, दिलीप राठोड, संतोष पवार, ऊसतोड कामगार आघाडी परभणी संपर्क प्रमुख गणपत जाधव, राजेश जाधव, गजानन दहिभाते, एकनाथ पवार यासह गावातील नागरिक व खेळाडू उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या