💥पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यात जमिनी गेलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या जमिनीचा आर्थिक मोबदला द्या...!

 


💥भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष विलास जोंधळे यांनी निवेदनाद्वारे सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली मागणी💥 

पालम प्रतिनिधी


पालम (दि.२१ सप्टेंबर) - तालुक्यातील दिग्रस येथील गोदावरी नदीवरील दिग्रस बंधाऱ्यांमध्ये पालम तालुक्यातील फरकंडा येथील शेतकऱ्यांची जास्तीची जमीन बॅक वॉटर मध्ये जात आहे व त्यांना कमी क्षेत्राचा मोबदला मिळाला आहे उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा संबंधित शेतकरी अनेक वेळा प्रशासनाला खेटे मारत आहेत पण त्यांना न्याय मिळेना फरकडा येथील वंचित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना  त्यांचा हक्काचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी आज 20/09/2022रोजी सहकार मंत्री अतुल सावे साहेब यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना  देण्यात आले व फरकंडा येथील शेतकऱ्यांचा मोबदला वाटपाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशी मंत्री महोदय यांना विनंतीही केली तीन ते चार वर्षापासून संबंधित प्रशासनाकडे शेतकरी रवेटे  मारत आहेत त्यांना मोबदला तात्काळ वाटप करण्याचे संबंधित विभागाकडे आदेश देण्यात यावे अशी मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष परभणी तथा महाराष्ट्र सुप्रसिद्ध व्याख्याते विलास जोंधळे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या