💥जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात चोरट्यांचा धुमाकून : चोरट्याची ४ दुकाने फोडली....!


💥अज्ञात चोरट्यांनी चार दुकान फोडून मोठा ऐवज लंपास केल्यामुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण💥

जिंतूर (दि.०५ सप्टेंबर) : जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात धुमाकूळ घालीत चोरट्यांनी परिसरातील चार दुकाने फोडून पोलिस प्रशासनाला खुले आव्हाणा दिले या घटनेत अज्ञात चोरट्यांनी चार दुकान फोडून मोठा ऐवज लंपास केल्यामुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

         शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील सोनी मेडीकल,यमुना मशनरी,पूरोहित स्विटमार्ट,भोलेनाथ ईलेक्ट्रीक व ईलेट्रॉनिक्स या चार दुकानांवर आज रविवार दि.०५ सप्टेंबर रोजी  मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला. दुकानांचे कुलूप तोडून मोठा ऐवज लंपास केला. या घटनेत नेमकी काय लूट झाली, हे कळले नाही. जिंतूर येथील पोलिस निरीक्षक दिपक दंतुलवाड यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. पाठोपाठ श्‍वान पथकानेही धाव घेवून मागोवा घ्यावयाचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकाराने सर्वसामान्य नागरीक अक्षरशः हादरले आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संतप्त दुकानदारांनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या