💥परभणी मनपा विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील विसावा कॉर्नर येथे विविध मागण्यासाठी रास्ता रोको...!


💥वंचित बहुजन आघाडीचे युवा शहर अध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रास्ता रोको करण्यात आला💥

परभणी (दि.२७ सप्टेंबर) - परभणी महानगरपालिकेच्या विरोधात शहरातील नेहरू नगरातील रस्त्याचे काम व नाल्याचे काम तसेच भारत नगरातील रस्ते व नाले वार्ड क्रमांक चार ते पाच या वार्डातील रस्ते व नाले सुधारणा करून देण्यात यावे तसेच परभणी शहरातील वांगी रोडच्या उद्घाटन झाले व 125 कोटी निधी आला हा निधी गेला कुठे याचा तात्काळ तपास केला जावा व वांगी वरचे रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे तसेच रमाई प्रधानमंत्री घरकुल आवास योजना याचा राहिलेला निधी तात्काळ वाटप करण्यात यावा तसेच परभणी शहरातील खराब झालेले रस्ते तत्काळ सुधारण्याचे आदेश पारित करण्यात यावे याकरिता वंचित बहुजन आघाडीचे युवा शहर अध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रास्ता रोको करण्यात आला.

  यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष नागोराव पांचाळ, मराठवाडा प्रशिक्षक प्राध्यापक सुरेश शेळके, मराठवाडा प्रवक्ता डॉक्टर धर्मराज चव्हाण, लोकसभा उमेदवार अलमगीर खान, दक्षिण जिल्हाध्यक्ष टी डी रुमाले, उत्तर जिल्हा अध्यक्ष सचिन गंगाखेडकर, युवा जिल्हाध्यक्ष सुमित भालेराव, महिला जिल्हाध्यक्ष सुनीताताई साळवे, युवा जिल्हा महासचिव तुषार गायकवाड, जिल्हा महासचिव सर्जेराव पंडित, जिल्हा महासचिव अमोल ढाकणे, भगवान दराडे, सतीश वाकळे, धम्मदीप साळवे, आकाश गायकवाड, बालाजी पाईकराव, तसेच वार्डातील नागरिक, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने या रास्ता रोको मध्ये सामील झाले होते. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी महा नगर पालिकेच्या विरोधात नारे दिले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या