💥मार्जिन मनी या योजनेची कार्यशाळा व ज्येष्ठ नागरीकांसाठी जागतिक स्मृतिभ्रंश दिवस साजरा.....!


💥सोनपेठ वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी इप्पर,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण गीता गुठ्ठे यांची उपस्थिती💥

परभणी (दि.26 सप्टेंबर) : जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी मार्जिन मनी व ज्येष्ठ नागरिकांसाठी जागतिक स्मृतिभ्रंश दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष एस.एस.कुलकर्णी हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण रुग्णालय,सोनपेठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी इप्पर,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण गीता गुठ्ठे यांची उपस्थिती होती.


यावेळी श्री. कुलकर्णी यांनी आपलया आई-वडिलांसाठी हा उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे सांगुन मातापित्यांच्या अडचणी समजुन घेऊन त्यांना वृध्दाश्रमामध्ये पाठविण्याची वेळ येऊ देऊ नये. त्यांना सन्मानाची वागणुक द्यावी तसेच त्यांच्याशी नियमीत संवाद साधावा भावना व्यक्त केली.

यावेळी डॉ. श्री. इप्पर यांनी ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढत जाणारा स्मृतिभ्रंश याबाबीवर सखोल मार्गदर्शन करताना म्हणाले की ज्येष्ठ नागरीकांमध्ये विसर भोळेपणा प्राथमीक पाया असुन, याचा शेवटचा टप्पा स्मृतिभ्रंश हा आजार आहे. हा आजारा आजच्या परिस्थीतीमध्ये फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच नाही, तर आजची तरुणपिढी अधिकरीत्या सोशल मिडीयावर जास्त राहत असल्यामुळे त्यांना देखील स्मृतिभ्रंश आजार होत असल्याचे दिसुन येत आहे. हा आजार टाळण्यासाठी जास्तीत जास्त कौटुंबिक सहवासामध्ये राहणे आपल्या आवडीच्या गोष्टीमध्ये रमणे, इ. प्रकारचे उपक्रम केल्याने हा आजार कमी होत असल्याचे त्यांनी सांगीतले.

श्रीमती. गुठ्ठे यांनी कार्यक्रमामध्ये केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजक यांना मार्जिन मनी या योजनेबाबत माहिती दिली. या योजनेअंतर्गत 10% स्वहिस्सा भरणा केल्या नंतर व बँकेने अर्जदारास स्टँडअप इंडिया योजनेंअंतर्गत 75% टक्के कर्ज संबंधित बँकेकडुन मंजुर केल्यानंतर उर्वरित 15% सबसिडी राज्य शासनामार्फत देण्यात येत असुन यासाठी संबंधिताने उद्योग आधार नोंदणी जातप्रमाणपत्र इ. कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लाभार्थी यांनी जास्तीत जास्त संख्येने प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्यात यावे तसेच यासंबंधी कांही अडचण आल्यास कार्यालयाशी संपर्क साधवा आसे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गीता गुठ्ठे यांनी केले.

यावेळी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  गीता गुठ्ठे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. या प्रस्तावनेत मातापिता व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ अधिनियम 2007, आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ नियम 2010 या कायद्याची माहिती व उद्देश सांगीतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या