💥डिजिटल इंडियाच्या देशात शेतकरी मात्र चिखलातच....!


💥साखरा ते हिवरखेडा पांदन रस्त्याची अत्यंत दुरवस्था💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा ते हिवरखेडा जोडणारा पांदण रस्ता याची अत्यंत दुरवस्था आहे, मात्र अद्यापही हा रस्ता ना मंजूर झाला ना पांदण रस्ता झाला, त्यामुळे या रस्त्याने ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना चिखलातच  येणं जाणं लागते, साखरा ते हिवरखेडा केलसुला मार्गे तसेच साखरा तांडा बोरखडी मार्गे डांबर रस्ता आहे, मात्र त्याच्या अंतर आठ ते नऊ किलोमीटर पडते, पण साखरा ते डायरेक्ट हिवरखेडा पादंन रस्ता झाला तर हिवरखेडा साखरा अंतर हेच पाच ते सहा किलोमीटर वरच येते, तसेच खडकी धोतरा साखरा हे आंतर सुद्धा खूप कमी येते, या रस्त्यांना ना कोणते वाहन जाते, तर साखरा ते हिवरखेडा पैदल रस्त्याचा वापर सध्या चालू आहे.


या रस्त्यावर येणाऱ्या जाणारे शेतकरी सुद्धा बैलगाडी किंवा पैदलच जाणे येणे करतात, हा रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील धान्य, तसेच शेतमाल, हे आणण्यासाठी हा रस्ता कोरडा होण्याची वाट पाहावी लागते, त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य तो दर मिळत नाही, एकीकडे देशात शेत ते थेट बाजार असे रस्ते जोडण्याची काम चालू आहे, मात्र हा रस्ता अद्यापही त्यामध्ये बसलेला नाही, त्यामुळे या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, तसेच हा रस्ता नसल्यामुळे शेतात नगदी पिके सुद्धा शेतकरी घेऊ शकत नाही, त्यामुळे या रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी साखरा आणि हिवरखेडा येथील नागरिकांमधून तसेच शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे, संबंधित विभागाने तसेच लोकप्रतिनिने हा प्रश्न सोडवावा अशी शेतकऱ्यांमधून नागरिकांमधून अपेक्षा आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या