💥परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे रोखला बालविवाह....!


💥सरपंच-उपसरपंच यांच्या उपस्थितीत हा बालविवाह थांबविण्यात आला💥

परभणी (दि.26 सप्टेंबर) : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आज सोमवार दि.26 सप्टेंबर 2022 रोजी परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालूक्यातील धनगर टाकळी येथे बालविवाह रोखण्यात आला.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला काल रविवार दि.25 सप्टेंबर 2022 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार दि. 26 सप्टेंबर, 2022 रोजी पुर्णा तालूक्यातील धनगर टाकळी येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार मुलीचे नाव, लग्नाचे ठिकाण, आणि मुलीच्या वयाचा पुरावा हस्तगत करण्यात आला. तसेच गावचे ग्रामसेवक आर.डी. घिरडकर, अंगणवाडी सेविका सुशिला पांचाळ, सरपंच-उपसरपंच यांच्या उपस्थितीत हा बालविवाह थांबविण्यात आला.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी चाईल्ड लाईनचे समन्वयक संदीप बेंडसुरे, टिम मेंबर सय्यद इशरत,राणी गरुड,जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे गजानंद पटवे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पंडीत, बीट जमादार केसगीर यांनी कार्यवाही केली....

राज्यात सर्वाधिक बालविवाहचे प्रमाण परभणी जिल्ह्यात आहे. त्यासाठी बालविवाह प्रतिबंध ही सामाजिक चळवळ होणे गरजेचे आहे. बालविवाहाची माहिती मिळताच संबंधितांनी 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. बालविवाहची माहिती देणाऱ्यांची माहिती गोपनीय ठेवली जाते असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या